HW News Marathi
क्राइम

माथेफिरु प्रवाशाने वाहन चालकास खंजीराने भोसकले

उत्तम बाबळे नांदेड :- नांदेड – भोकर महामार्गावरील माै.खरबी शिवारात मॅग्झिमो प्रवासी वाहनातील एका माथेफिरु प्रवाशाने धारदार खंजीराने वार करुन चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला व मॅग्झिमोसह अन्य २ वाहनांच्या काचा फोडून एकच धुमाकुळ घालत मोठे नुकसान केले आहे.जखमी चालकावर नांदेड येथे उपचार करण्यात येत असून त्या अनोळखी माथेफिरु प्रवाशा विरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१४ मे २०१७ रोजी रात्री ८:३० वाजताचे दरम्यान नांदेड कडून भोकरकडे प्रवाशी घेऊन निघालेले मॅग्झिमो क्र.एम.एच.२६ ए.एफ.२७८८ हे प्रवासी वाहन नांदेड – भोकर महामार्गाने माै.पांढरवाडी ते खरबी ता.भोकर शिवारात आले असता रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान त्याच मॅग्झिमो वाहनातील एका प्रवाशाने अचानकपणे चालकास वाहन थांबविण्यास सांगीतले.यावेळी चालक बालाजी विठ्ठल करंदीकर (३६) रा.रिठ्ठा ता.भोकर याने ही रात्रीची वेळ आहे व कोणतेही गाव जवळ नसल्याने मी येथे हे वाहन थांबवू शकत नाही म्हटले असता त्या प्रवाशाला राग अनावर झाला आणि त्याने चालकाची गच्ची धरुन धावते वाहन थांबविले.तसेच क्षणाचाही विचार न करता करमेला ठेवलेले धारदार शस्त्र खंजीर काढले व चालकावर त्या खंजीराने सपासप वार केले.यात मांडीवर,कमरेच्या बाजूस व हातावर त्या खंजीराने जबर वार करुन भोसकल्याने हा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.हा माथेफिरु प्रवासी मदतीसाठी पुढे सरसावलेल्या अन्य प्रवाशांवरही धावून गेला व वार करण्याच्या धमक्या देऊ लागला.यामुळे त्यास कोणीही धरु शकले नाही.याचाच गैर फायदा घेत त्याने मोठ्या दगडाने मॅग्झिमोच्या सर्व काचा फोडल्या व पलायन केले.तो अंधारात निघुन गेल्याचे पाहून व जखमी चालकावर तात्काळ उपचार करने गरजेचे असल्याने जखमी चालक बालाजी करंदीकर याने आपले वाहन आणि त्यातील प्रवासी घेऊन भोकर गाठले. कांही वेळानेच नांदेड कडून भोकरकडे राज्य परिवहन महामंडळाची बस (एस.टी.) क्र.एम.एच.२० बी.३५४६ ही येत असतांना अंधारात दबा धरुन बसलेला तो माथेफिरु प्रवासी अचानक रस्त्यावर आला व हात दाखऊन बस थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतू चालकाने त्या बसची गती कमी केली पण ती न थांबविल्याने त्या माथेफिरुने बसवर दगडफेक केली व यात बसच्या काचा फुटल्या.या नंतर तेथे तीर्थ यात्रेस भक्तगण घेऊन जात असलेली एम.एच.०६ बी.एम.४७९१ महिंद्रा स्कार्पियो गाडी आली असता या गाडीवर देखील त्याने दगडफेक केली. सुदैवाने या दोन्ही वाहनातील प्रवाशांना दगड लागले नाहीत म्हणून अनर्थ टळला.चालक बालाजी करंदीकर यांनी भोकर पोलीसांत याबाबद माहिती दिल्यावरुन घटनास्थळी पोलीस पोहचले.परंतू तो माथेफिर प्रवासी तेथे मिळाला नाही.या माथेफिरुच्या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.तर तीन वाहनांच्या काचा फुटल्याने जवळपास ४० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.चालक बालाजी करंदीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्या अनोळखी माथेफिरु प्रवाशाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करने,विना परवाना शस्त्र बाळगणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा भोकर पोलीसांत दाखल करण्यात आला असून महामार्गावर धारदार शस्त्र घेऊन एकच धुमाकूळ घालणा-या या फरारी माथेफिरुच्या शोधासह पुढील तपास पो.नि.संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुरेश भाले हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

News Desk

श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

Aprna

असह्य विवाहितेवर वारंवार बलात्कार

News Desk