HW News Marathi
क्राइम

मुलीची हत्या प्रकऱणी बापाला फाशी

नाशिक मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने बापाने रागापोटी स्वताच्या मुलीची गळा दाबून हत्या केली होती याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी बापाला फाशिची शिक्षा सुनावली आहे. 2013 साली आरोपी एकनाथ कुंभारकरने रिक्षात बसलेल्या गर्भवती मुलीची गळा आवळून हत्या केली.

आई आजारी असल्याचे सांगून एकनाथ कुंभारकरनं मुलगी निशाला रिक्षात घेऊन गंगापूर रोडवर नेलं. एका हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबवून रिक्षा चालकास मुलीच्या आईला बोलवण्यास पाठवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने निशाचा दोरीनं गळा आवळत निर्घृण खून केला होता. रिक्षा चालक प्रमोद आहिरे यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्याने मुलीस सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा आणि पोटातील गर्भाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रिक्षा चालक प्रमोद अहिरेची एकमेव साक्ष महत्वाची ठरल्याने आरोपी बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

”हॉटेल ‘ललित’मध्ये अनेक गुपितं”

News Desk

मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

News Desk

बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्यातील दोषी तेलगी व्हेंटिलेटरवर

News Desk
क्राइम

साप चावल्यानं तरूणीचा मृत्यू

News Desk

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्ह्यातील माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील एका २७ वर्षीय तरुणीचा झोपेत असतांना विषारी सर्पदंश झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून भोकर पोलीसात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माै.सावरगाव (मेट) ता.भोकर येथील भोसले कुटूंब १६ जून २०१७ रोजी शेतातील काम करुन सायंकाळी घरी परतले.काम करुन थकल्यामुळे लगेच झोपी गेले.याच रात्री दरम्यान सर्वजन झोपलेल्या अवस्थेत असतांना एका विषारी सापाने घरात प्रवेश केला व कु.सुरमा नथू भोसले (२७) हिला दंश केला.यामुळे तिला उपचारार्थ भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.भोकर तहसिल कार्यालयातील सोनारी सज्जाचे तलाठी एस.जी.जगताप यांनी रुग्णालय व घटनास्थळी भेट दिली आणि रितसर पंचनामा केला आहे.सदरील पंचनाम्याचा अहवाल त्यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्याकडे सादर केला असून तहसिलदार मुंढे यांनी तो ” स्व.गोपीनाथ मुढे नैसर्गीक आपत्ती व अपघात विमा ” मंजूरीसाठी तात्काळ वरीष्ठांकडे पाठविला आहे.तसेच भोकर पोलीसांनी या प्रकरणी १७ जून रोजी आकस्मीत मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts

पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहितेंवर गोळीबार

News Desk

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

बोगस कॉलसेंटवर छापा, 9 जण अटक

News Desk