HW News Marathi
क्राइम

माहुरमध्ये १३ लाख रूपये किमतीचे गुटखा जप्त   

उत्तम बाबळे

नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने माहूर तालुक्यात तिसरी धाडसी कारवाई केली असून यात ६ लाख रुपयाचा अवैध गुटखा व बोलेरो जीप असा १३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे ९ जून २०१७ रोजी रात्री माहूर तालुक्यात गस्तीवर असतांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन मध्यरात्री दरम्यान माहूर – सिंदखेड रस्त्यावरील रमय्या बार जवळ छापा टाकला असता सागर नावाच्या गुटख्याचे थैले काही लोक तेथे बोलेरो जीप मध्ये भरत असतांना आढळले.दरम्यान पाऊस सुरु झाला व अंधार होता.या बाबीचा फायदा घेऊन तेथील परिसर त्यांच्या माहितीचा असल्याने आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले.या धाडसी कारवाईत सागर नावाचा अंदाजे ६ लाख रुपयाचा गुटखा व अंदाजे ७ लाख रुपये किमतीची क्र.एम.एच.१३ ए.सी.०१५३ ही बोलेरो जीप ताब्यात घेतली.असा एकूण १३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून सिंदखेड पोलीसांत पुढील कायदेशीर कारवाई करणे सुरु आहे.सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अन्न व औषधी प्रशासन विभाग नांदेड यांच्या अधिका-यांना या बाबद माहिती देण्यात आली असून ते गुटखा बंदी अधिनियमानूसा कारवाईचा गुन्हा सिंदखेड पोलीसांत दाखल करणार आहेत.तर जीप व मुद्देमाल सापडलेल्या ठिकाणच्या पुरवाव्यावरुन आम्ही त्या गुटखा तस्करांना देखील लवकरच जेरबंद करु.

माहूर तालुक्यातील ही या पथकाची तिसरी धाडसी कारवाई असून पथकाचे अभिनंदन होत आहे,तर अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणानले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

News Desk

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची…”, उदयनराजे

News Desk

नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

News Desk