HW News Marathi
क्राइम

महावितरणाचे सहाय्यक अभियंता पराग काकडे ,लाईन हेल्पर शेख दावलशहा १५ हजार लाच घेताना रंगे हात अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- कंधार पं.स.चे गटविकास अधिकारी यांना लाच स्विकारतांना कांही दिवस लोटले नसतांनाही एसीबी ने दुसरी विकेट घतली असून महा वितरण कंधार शहर शाखेच्या सहाय्यक अभियंता पराग काकडे व त्यांचे सहकारी लाईन हेल्पर शेख दावलशहा साहिबशहा यांना १५ हजार रुपयाची लाच स्विकारतांना २२ मे रोजी रंगेहात पकडले आहे.यामुळे कंधार येथील अशा काही अधिकारी व कर्मचा-यांत एकच खळबळ झाली आहे. माै.मानसपुरी ता.कंधार येथील एका महिलेच्या सर्वे नं.१०५ मधील शेतातील विद्युत पुरवठा करणारे दोन विद्युत खांब वादळी वा-याने तुटले होते.हे खांब त्वरीत बसऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा म्हणून त्या शेतकरी महिलेने महावितरण कंधार शहर शाखेत केला होता.त्याच अनुशंगाने शेतकरी महिलेच्या मुलाने या कामासाठी पाठपुरावा केला असता त्यांना सहाय्यक अभियंता पराग सुरेश काकडे यांनी २५ हजार रुपयाची मागणी केली.तडजोडी अंती १५ हजार रुपये देण्याचे त्या शेतकरी महिलेच्या मुलाने मान्य केले. आणि दि.१८ मे २०१७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग शाखा नांदेड यांच्याकडे याबाबद रितसर तक्रार दिली. सदरील तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग शाखा नांदेड चे पोलीस अधिक्षक संजय लाठकर व परिक्षेत्र पोलीस उप अधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सिद्धार्थ माने,पो.नि.दयानंद सरवदे,पो.ना.व्यंकट शिंदे,शेख असलम,पो.काॅ.सुरेश पांचाळ,पो.काॅ.चालक शेख मुजिब यांच्या पथकाने २२ मे २०१७ रोजी साफळा रचला व सायंकाळी लाईन हेल्पर शेख दावलशहा मार्फत ठरल्या प्रमाणेची १५ हजार रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली व ती सहाय्यक अभियंता पराग काकडे यांना देतांना रंगेहात पकडले. लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाल्यावरुन सहाय्यक अभियंता पराग सुरेश काकडे व लाईन हेल्पर शेख दावलशहा साहिबशहा ,दोघेही महावितरण शहर शाखा कंधार जिल्हा नांदेड यांना या पथकाने अटक केली.तसेच शेतकरी मुलगा यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे ,कंधार येथे कलम ७,१२,१३ (१)(ड) यासह १३ (२) ,भ्ष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे लाच घेतल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग व कंधार पोलीस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाणा : शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्यास अटक, उकीरड्यात पुरलेले 42 लाख जप्त

Manasi Devkar

सरबजित सिंगच्या भावाचा दलबीर कौरवर थेट आरोप

News Desk

मुलीच्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याने, मुलीच्याच बापावर रॅकेल टाकून जाळले

News Desk