उत्तम बाबळे
नांदेड – लोहा महामार्गावरील माै.कारेगाव ता.लोहा गावाजवळील शिवारातील रस्त्यापासून २०० फुट अंतरावर ९ जून रोजी एका ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा धारदार शस्त्राने खून करुन फेकलेले प्रेत आढळले असून या प्रकरणी लोहा पोलीसांत अज्ञात इसामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड – लोहा महामार्गावरील माै.कारेगाव या गावाजवळील शिवारातील रस्त्याच्या बाजूला २०० फुट अंतरावरील शेतात ९ जून २०१७ रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान शेतातून परत येत असलेल्या काही शेतक-यांना व गावक-यांना पांढ-या रंगाचे कपडे परिधान केलेल्या आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचे प्रेत दिसले. याबाबतची माहिती त्यांनी लोहा पोलिसांना दिली.त्यावरुन लोहा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक चाटे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले.घटनास्थळी येऊन त्यांनी त्या प्रेताची पडताळणी केली असतासदरील मयत पुरुष ३५ ते ४० वयोगटातील असावा असा अंदाज वर्तविण्यात आला व त्याचा कपड्यांची झडती घेतली असता खिशात एक आधारकार्ड सापडले. त्यावर नाव अशोक वैजनाथ सुरवसे रा. सोनीमोहा ता. धारूर जि. बीड असे लिहलेले असल्याने त्याची ओळख पटली आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते त्याच्या अंगावर धारदार शस्त्र कोयत्याने बरेच गंभीर घाव केलेले दिसत होते.तर कांहीच्या मते हा मयत व्यक्ती दुस-या जिल्ह्यातील असल्याने त्याचा प्रथम खून करण्यात व प्रेत येथे आणून फेकून मारेक-यांनी पळ काढला असावा असा अंदाज वर्तविला.पो.नि.अशोक चाटे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला व ते प्रेत शवविच्छेदनासाठी लोहा येथील शासकिय रुग्णालयात हलविले.तसेच अज्ञात मारेक-यांविरुद्ध कायदेशीररित्या गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया लोहा पोलीसांत सुरु होती व पुढील तपास लोहा पोलीस करणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.