HW News Marathi
क्राइम

30 हजारसाठी मुलाचे अपहरण

परभणी :साेलू शेेतक-याने 30 हजार परत केले नसल्याने त्यांच्या दहावीत शिकत असलेल्या मुलास पळवून नेल्याची घटना 11 फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी अपहरणकर्त्यांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिवाळीच्या आठ दिवसआधी सावरगाव (ता. जिंतूर) येथे राहणारा बडी पवार याने ऊस तोडणीसाठी कोल्हापूरला नेण्यासाठी हेलस येथील विलास वाच्छू राठोड आणि त्याच्या पत्नीला ३० हजार रुपये उचल दिली. मात्र विलासच्या डोक्यात गाठ आल्याने त्यांना कामाला जाता आले नाही. तसेच उचलही शस्त्रक्रियेवर खर्च झाली.

दरम्यान, 8 फेब्रुवारी रोजी विलास राठोड यांचा मुलगा समाधान राठोड (15) व त्याची आई चिकलठाणा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे बडी पवार, रामा पवारही आले होते. 11 फेब्रुवारी रोजी समाधान गायब झाल्याचे लक्षात आले 12 फेब्रुवारी रोजी बडी पवार याने विलासशी मोबाइलवरून संपर्क करून, पैसे देणे असल्याने समाधानला ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर राठोड यांनी बडी पवार, रामा पवार यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

100 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

News Desk

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk

भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची क्रूर हत्या

Gauri Tilekar