HW News Marathi
क्राइम

निलम गोऱ्हें यांना जिवे मारण्याची धमकी : आरोपी अटक

मुंबई शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हें यांना जिवे मारण्याची धमकी देणा-याला पोलिसांनी अटक केली असून दिपककुमार प्यारेलाल गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा असून त्याने यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे.

निलम गोऱ्हें यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निलम गोऱ्हेंनी फोन बंद केला. मात्र, गोऱ्हे यांच्या दुसऱ्या फोनवर 27 तारखेला धमकीचा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली होती. मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत आर्यनच्या सुटकेस नकार

News Desk

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

News Desk