HW News Marathi
क्राइम

भरदिवसा स्कायवॉकवर चॉपरने हल्ला झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यू , चार जणांना अटक

गौतम वाघ

उल्हासनगर स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर देखिल प्रवाश्यांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असतानाच ११ एप्रिलला भरदिवसा ऐसी रिपीयर करणाऱ्या तरूणाला स्कायवॉकवर ४ जणांच्या टोळक्याने अडवून त्याच्यावर चॉपरने हल्ला करून मोबाईलफोनसह रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात जखमी तरुणांचा १४ एप्रिल रोजी मुंबईच्या सायन रुग्णालयात सायंकाळच्या सुमाराला मूत्यू झाला आहे.

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. प्रशांत लोखंडे उर्फ गोल्या, (१८) समाधान सिद्धार्थ घीवरे, संजय दामू चव्हाण उर्फ बॉडीगार्ड, (२९) आणि अर्जुन उर्फ बाळकुण्ण थापा, (१७) अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे, त्यांना आज दुपारच्या सुमाराला न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपी अर्जुन उर्फ बाळकुण्ण थापा, याची भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मांडा टिटवाळा येथे राहणारा मोहोम्मद अब्दुल रहिम वारिसअलि शेख (२६) हा तरूण कल्याण येथिल चिकणघर परिसरातील नाहुर इंटरप्राईसेस या सर्विस सेंटरमध्ये काम करीत होता. रहिम हा ऐसी रिपीयरींगचे काम करीत असल्यामुळे कंपनीने त्याला उल्हासनगर कॅम्प नं. ४ येथे पाठवले होते. रहिम हा त्याचा सहकारी सुफियान इंद्रिस याच्यासोबत त्याठिकाणी काम करायला गेला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते दोघेही काम पुर्ण झाल्यावर उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील स्काय वॉकवरून प्लॅटफॉर्म नं. १ वर येत होते. त्यावेळी स्काय वॉकवर उभे असलेल्या ४ तरूणांनी रहिम याला अडवले व त्याच्याजवळील पैशाचे पॅकेट व मोबाईल फोन मागितला. रहिम याने देण्यास नकार दिल्याने त्या तिघांनी त्याला मारहाण करीत आपल्याजवळील धारदार चॉपरने रहिम याच्यावर वार करून जबरदस्तीने त्याच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. रहिम हा रक्ताच्या थारोळयात त्याठिकाणी पडला होता. त्याचा मित्र इंद्रिस याने आरडाओरडा केल्यावर रेल्वे स्थानकात डयुटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी. भैरकदार यांनी त्याठिकाणी धाव घेतली. जखमी झालेल्या मोहम्मद अब्दुल रहिम याला प्रथम उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती चिंताजणक असल्याने त्याला कल्याण येथिल सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मूत्यू झाला आहे.

उल्हासनगरातील स्काय वॉकवर लुटमारीचे प्रकार सातत्याने घडतअसल्याने नागरीक व प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. रेल्वे स्थानकातील स्काय वॉकवर सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली आहे. रात्रीच्या सुमारास स्काय वॉकवरील लाईट बंद असल्यामुळे अनैतिक प्र्रकार चोरी व लुटमारीच्या घटना घडत असतात. स्काय वॉकवर पोलिसांचा गस्त नसल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. दिवसा या स्काय वॉकवर तरूण-तरूणींचा अश्लील हैदोस तर रात्री व सायंकाळच्या सुमारास लुटमारीच्या घटना घडत असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एनसीबीचं पुढचं टार्गेट अभिनेता शाहरूख खान’ ?

News Desk

पोलीस ठाण्यातून चोरीला गेलेली पिस्तुले सापडली पोलिसाच्या घरी

News Desk

नगरच्या दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्कच्या अधीक्षक जाधव निलंबित

News Desk