HW News Marathi
क्राइम

नऊ वर्षाच्या चिमुरडीवर नराधम युवकाने केला बलात्कार,नागरीकांनी झोडपून केले पोलीसांच्या हवाली

उल्हासनगर( गौतम वाघ ): शेजारीच राहणा-या नऊ वर्षाच्या लहान मुलीला घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने संभोग करणा-या युवकाला स्थानिक महिलांनी बदडून पोलीसांच्या स्वाधिन केल्याची घटना मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये पिडीत मुलगी राहते. तिच्या घराशेजारी रूपेश बांद्रे(28) हा तरूण राहतो. त्याने पिडीत मुलीला तु आमचे घरी नाटक बघायला चल असे सांगुन घरी नेले. तिला घरी गेल्यावर अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्याने जबरदस्तीने तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी जबरी संभोग केला. हि बाब तिच्या नातेवाईकांना मुलीने सांगितल्यावर परिसरातील महिलांनी रूपेशला पकडून झोडपत पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रूपेश विरोधात भारतीय दंडविधान कायद्यांतर्गत 376(2) सह बालकांचे लैगिंक अपराधापासुन सरंक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेशला मध्यवर्ती पोलीसानी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यानी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अन् मुलानं केला वडिलांचा खुन

News Desk

दाऊद इब्राहिमच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Aprna