HW News Marathi
क्राइम

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पास्टरचा बलात्कार, मैत्रिणीसोबतही समलैंगिक संबंध ठेवण्यास केले प्रवृत्त

उल्हासनगर (गौतम वाघ): एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका पास्टरला अटक करण्यात आले आहे. पास्टरने दोन वर्षे मुलीचा गैरवापर केला तसेच आपल्या एका मैत्रिणीसोबत समलैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायका माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून पास्टरला अटक करण्यात आली आहे.

गीतकुमार उर्फ श्रीजित पिल्ले (४१) असे नराधमाचे नाव असून तो आशेळे येथे राहतो. तर पिडीत अल्पवयीन मुलीशी समलैंगिक संबध प्रस्थापित करून तिला उत्तेजित करणाºयाआरोपी महिलेचे नाव (बदलून ) माया (२५) असून ती शहाड परिसरात राहणारी आहे.

१५ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या आईसह उल्हासनगर कँम्प नंबर ५ येथील एका इमारतीमध्ये राहते. २०१५ पासून ती उल्हासनगरमधील एका चर्चमध्ये जात असे, या ठिकाणी पास्टर श्रीजित पिल्ले याची मुलीच्या आई बरोबर ओळख झाली. या ओळखीमुळे मैत्री जमल्याने त्याची एकमेकींच्या घरी येणे जाणे होते होते. पिडीत मुलीची आईं एका खाजगी कंपनीत काम असल्याने ती दिवसभर बाहेर असे. याची संधी साधून आरोपीने मुलीवर लैगिंक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर या नराधमाने आपल्या मैत्रिनीशी तिची मैत्री करून दिली व तिला अश्लिल चित्रिकरण दाखवत समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलिसांचा पिल्ले व त्याच्या मैत्रिणीला अटक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

दुसरे लग्न करणा-या नवरोबासह सासू-सासना अटक

News Desk

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar