मुंबई | जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया (वय ५१) यांनी कफ परेडमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना काल (१४ मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. कपाडिया यांनी आजारापणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
#Mumbai: A 51-year-old GST superintendent allegedly committed suicide by jumping off the World Trade Centre in Cuffe Parade, yesterday. The police have registered an Accidental Death Report, further investigation underway.
— ANI (@ANI) May 14, 2019
दहा महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यानंतर त्यांच्या ब्रेन स्ट्रोकवर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कपाडिया यांनी सात महिन्याच्या सुट्टीनंतर तीन महिन्यांपूर्वी ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन देखील कपाडिया हे काहीसे निराश होते. आजारणाला कंटाळून कपाडिया यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी ड्यूटीवर उपस्थित लोकांचा जबाब नोंदवला असून कुटुंबीयांची चौकशी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.