Connect with us

क्राइम

दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडले

Gauri Tilekar

Published

on

चंद्रपूर | पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे हे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (स्कॉर्पिओ) पाठलाग करत असताना त्यांना त्याच वाहनाने चिरडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी ही घटना घडली आहे. छत्रपती किसनराव चिडे यांची एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती.

दारूची वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर थांबलेले असताना गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरून त्या गाडीच्या दिशेने चालू लागले. तितक्यातच दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीने रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घातली. इतर पोलिस तिथून बाजूला झाले मात्र दुर्दैवाने छत्रपती चिडे या गाडीखाली चिरडले गेले. पवनी-तोरगाव रस्त्यावरून दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांच्यासह गाडीचा पाठलाग सुरू केला होता.

क्राइम

धारावीत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक

Shweta Khamkar

Published

on

मुंबई ।  धारावी परिसरात राहणाऱ्या शैलेशकुमार हजारीलाल वैश्य या तरुणावर चार जणांनी शुक्रवारी(९ ऑक्टोबर) प्राणघातक हल्ला केला आहे. शैलेशकुमारला वय (२३) गंभीर दुखापतीसह जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. या विरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमृत बसवराज आसनली, अविनाश बसवराज आसनली, जेम्स भास्कर यलागेट्टी आणि स्टॅनली ऊर्फ माता शान्सुकुमार दोडूमणी अशी या आरोपींची नावे आहेत. या चौघांनाही धारावी पोलिसांनी काल (११ ऑक्टोबर) अटक केले आहे. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शैलेशकुमार हा सायन येथील धारावी या विभागात राहतो. शुक्रवारी रात्री दहा वाजता तो त्याचा मित्र शाहरुख शेखसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी तिथे चारही आरोपी तरुण आले आणि शैलेशकुमारसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत शैलेशला डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर ते चौघेही आरोपी तेथून पळून गेले. स्थानिक रहिवाशांनी शैलेशकुमारला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. शैलेशवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शैलेशकुमारची तक्रार नोंदवून घेतली होती.

Continue Reading

क्राइम

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

News Desk

Published

on

नवी दिल्ली | भारतात जानेवारी ते जून या कालावधीत जवळपास ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. एफ-सेक्युअर या संस्थेने जगभरातील सायबर गुन्ह्यांचे आणि सायबर हल्ल्यांचा सर्व्हे केला आहे. एफ-सेक्युअर संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत. यातही रशियामधून भारतावर सर्वाधिक (२,५५,५८९) सायबर हल्ले करण्यात आले असल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ अमेरीका (१,०३,४५८), चीन (४२,५४४), नेदरलँड (१९,१६९) आणि जर्मनी (15,३३०) या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत.

भारतामधून देखील इतर देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतामधून ऑस्ट्रिया (१२,५४०), नेदरलँड (९,२६७), ब्रिटन (६३४७), जपान (४,७०१ ) आणि युक्रेन (३,७०८) या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Continue Reading

HW Marathi Facebook

November 2018
M T W T F S S
« Oct    
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

महत्वाच्या बातम्या