HW News Marathi
क्राइम

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

मुंबई | बॉलीवुड अभिनेता सलमान खान यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली आहे. सलमानने आयुक्तांची भेट घेतल्यामुळे काही काळसाठी का होईना चर्चेला उधाण आले होते. परंतु, सलमान खानने बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी आली होती. या पार्श्वभूमीवर सलमान मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात वेपन्सच्या लायसन्ससाठी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचे वडील सलीम खान वांद्रे परिसरात मॉर्निंग वॉक गेले असताना अज्ञात व्यक्तीकडून पत्र देण्यात आले. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.  सलमानने आज (22 जुलै) पोलीस आयुक्तांची भेटीत वेपन्सच्या लायसन्ससाठी रितसर अर्ज दाखल केला आहे.

लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई टोळीचे प्रमुख असून बिश्नोईचे वय 28 वर्षांचा आहे. बिश्नोईने कमी वयात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हेंची त्यांच्यावर नोंद आहे. बिश्नोईवर 50 पेक्षा जास्त गुन्हेंची नोंद आहे. या बिश्नोईने सिद्धू मुसेवालाची हत्या केली होती. यामुळे संपूर्ण देशात बिश्नोईविरोधात संतप्ताची लाट उसळली आहे. या दरम्यान बिश्नोईच्या टोळीकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जुन्या नोटा बदलण्याचा धंदा जुलैमध्येही तेजीत

News Desk

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला AU नावाने 44 कॉल; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Aprna

छगन भुजबळ दीड वर्षानंतर तुरूंगाबाहेर येणार

News Desk