मुंबई – पश्चिम उपनगरातील (Western Suburbs) मजासवादी (Majaswadi) परिसरात घरातील नोकरानेच वयोवृद्ध मालक व मालकाच्या पत्नीवर चोरीच्या (Robbery) उद्देशाने धारधार शस्त्राने (Sharp Weapon) हल्ला केल्याची घटना घडली आहे. मजासवादीच्या प्रसिद्ध सप्रे वडापाव परिसरात सोमवरी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात वयोवृद्ध मालकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर चिपळूणकर असे या 70 वर्षीय मालकाचे नाव आहे. तर या हल्यात 69 वर्षीय सुप्रिया चिपळुणकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) उपचार सुरू आहेत. जोगेश्वरीच्या (Jogeshwari) समर्थ नगरमधील श्री समर्थ को.आॅप.हौ.सोसायटीत हे दाम्पत्य राहत होते.
चिपळुणकर यांच्या घरात पप्पू गवळी नावाचा नोकर कामाला होता. पप्पूने वयोवृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी पप्पू हा फरार झाला. घटनेची माहिती घेऊन आणि सीसीटीव्हीची पडताळणी केली तेव्हा पप्पूनेचं हे कृत्य केलं असल्याचे निष्पन्न झाले. सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात (Meghwadi Police Station) भा.दं.वि चे कलम ३०२, ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघवादी पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.