HW News Marathi
क्राइम

कल्पतरू सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षाविरोधातील गुन्हा प्रकरण ,उल्हासनगर पोलिस वादाच्या भोव-यात

उल्हासनगर (गौतम वाघ) : कल्पतरू पतसंस्थेकडून घेतलेले ६१ लाख रुपयांच्या कर्जाचा परतावा टाळण्यासाठी कर्जदाराने काही साक्षीदाराच्या मदतीने षडयंत्र आखत पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात बोगस गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदन अमित वाधवा यांनी पोलिस महासंचालक आणि ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे. अमित वाधवा यांनी या प्रकरणाशी संबंधीत काही पुरावे आणि रेकॉर्डिंग देखील यात सदर केले आहे. त्यामुळे उल्हासनगर पोलिस ठाण्यातील काही अधिकारी देखील अडचणीत येणार आहेत.

 

उल्हासनगर येथे कल्पतरू ही सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेचे संचालक अमित वाधवा हे आहेत. अमित विरोधात गुन्हा दाखल करणारे उमेश राजपाल देखील पतसंस्थेच्या सभासद असून त्यानी व्यवसायासाठी तब्बल 61 लाखांचे कर्ज घेतले असल्याचे पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिले आहेत. उमेश राजपालने घेतलेल्या कर्जाची अनेक वर्षांपासून ही थकबाकी असून अनेकदा पतसंस्थेने याबाबत नोटीस बजावली होती. तीन दिवसांपूर्वी उमेश राजपालने अमित वाधवा याच्या विरोधात मारामारीच्या गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांत अमित वाधवा हे फरार आहेत, मात्र त्यांनी पोलीस महासंचालकांना आणि ठाणे पोलिस आयुक्तांना निवेदन आणि मोबाइलवर रेकॉर्ड केलेल्या कॉलची ध्वनिफीत दिली आहे.

अमित वाधवाने निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी उमेश राजपालचा अमित वाधवाला फोन आला. त्याला एका व्यक्तीने डॉल्फिन क्लब जवळ बेदम मारले असल्याचे सांगितले. तसेच अमित याना भेटण्याची इच्छा व्यक्त करीत अमितचे घर गाठले. उमेश हा अमितच्या घरी आल्यानंतर उमेशचा कर्जातला साक्षीदार रोशन माखिजा हा अमितच्या इमारतीखाली आला. त्याने अमितला उमेशसह इमारतीच्या खाली बोलावले. उमेश आणि अमित हे इमारतीखाली येताच रोशन व त्याच्या साथीदारांनी दोघांना मारण्यास सुरुवात केली. अमितने स्वतःचा बचाव करीत घर गाठत उल्हासनगर पोलिसांशी फोन वर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. या घटनेनंतरही अमित आणि उमेश यांच्यामध्ये भ्रमण ध्वनीवर संभाषण असून अमितने उमेशला पोलीस ठाणे गाठण्यास सांगून मी पण येत असल्याचे सांगितले. या सर्व संभाषणाच्या भ्रमण ध्वनीवरील ध्वनिफीत निवेदनाबरोबर जोडल्या आहेत.

मध्यवर्ती रुग्णालयात वाधवा यांच्यावर उपचार देखील करण्यात आला, त्याचा मेमो देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे. असे असून सुद्धा त्यांची दिशाभूल करून उमेश राजपालला दमदाटी करीत माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगणे, हे केवळ कर्ज बुडविण्यासाठी केलेलं षडयंत्र असून यासंदर्भात मी पोलीस महासंचालकांकडे आणि ठाणे पोलिस आयुक्तांना न्यायासाठी दाद मागितली असल्याचे अमित वाधवा यांच्या निवेदनात नमूद केले आहे. सदर गुह्यतील बोगसपणा उघड़किस आल्यास स्थानिक उल्हासनगर पोलिस ठाण्यातील काही वरिष्ठ अधिकारी देखील अडचणीत येणार असल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

News Desk

माथेरानमध्ये पोलिसांकडूनच वाहन बंदीचे उल्लंघन, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

News Desk

अंधश्रद्धेचा फायदा घेऊन व्यावसायिकाला गंडा

News Desk