HW News Marathi
क्राइम

आरोपीला वाचवण्यासाठी भ्रष्ट पोलिस अधिका-यानीच मुलीचा गर्भपात केला

लातूर जिल्ह्यातील देवणी येथील एका अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पोलिस अधिका-यांनी गर्भपात केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधिका-यावर कारवाई करण्याऐवजी बदली करण्यात आलीय. कृष्णदेव पाटील असे भ्रष्ट अधिका-याचे नाव आहे.

देवणी तालुक्यात घडलाय. ऊस तोडणी कामगाराच्या घरातील या पीडित मुलीला मुकादमानं फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर ही पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकाराची देवणी पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलीला मदत करण्याऐवजी पोलीस अधिकारी कृष्णदेव पाटील यानं तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. शिवाय तिच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचं आमिषही दाखवलं.

पीडित मुलीच्या कर्मकहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची बदली केलीये. पण या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. आरोपींना पाठिशी घालून पीडित मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित मुलीच्या घरच्यांनी केलीय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातंग समाजाच्या मयत दफनविधीला गावक-यांचा विरोध, पोलीस बंदोबस्तात झाला दफनविधी

News Desk

रेणापुर शिवारात गांजाने भरलेले पोते फेकून तस्कर फरार

News Desk

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा

News Desk