एका चिमुकलीवर बलात्कार व तिच्या हत्येच्या दोन संशयित आरोपींना संतप्त जमावाने पोलिस ठाण्यातून बाहेर खेचून ठेचून मारल्याची घटना अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील तेजू गावात घडली. आरोपी जगदीश लोहार (२५) अाणि संजय सोबोर (३०) असे मृत आरोपीचे नाव आहे. १२ फेब्रुवारीला या नराधमांनी ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. १७ फेब्रुवारीला चहाच्या मळ्यात तिचा मृतदेह सापडला होता. तिचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले होते. शरीरावर कपडे नव्हते. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपींना आसाममधून अटक केली होती. कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. त्यांना तेजू पोलिस ठाण्यात कैदेत ठेवले होते. याची माहिती कळताच ५०० ते १ हजार लोकांचा जमाव ठाण्याबाहेर जमला. पोलिस ठाण्यावर हल्ला करत त्यांनी पोलिसांना पकडून ठेवले. कोठडीतून आरोपींना सोडवून त्यांना फरपटत भरचौकात आणले गेले. यानंतर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. जमावाने पाेलिस ठाण्यातही तोडफोड केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post