HW News Marathi
क्राइम

जातीवाचक शिवीगाळ केल्याने चालकाची आत्महत्या

नांदेड – नोकरीचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने, तसेच जातीवाचक शिवीगाळ करून कामावरून काढून टाकल्याने भोकर येथील एका जेसीबी यंत्रचालकाने विषप्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी कंत्राटदार व त्याचा सुपरवाझर अशा दोघांविरुद्ध भोकर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणिअट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कंत्राटदार गंगाधर उर्फ बाबूराव शक्करगे सायाळकर यांच्या जेसीबी मशिनवर चालक म्हणून काम करणारा सुरेश आनंदराव गायकवाड (३५, रा.कोळी ता. हदगाव) हा गरीब मागासवर्गीय तरुण काही कामानिमित्त पत्नीसह गावाकडे गेला व ३ दिवस कामावरगेला नाही. त्यामुळे तुझा हिशोब कर व उसणवारीचे पैसे त्वरीत परत कर म्हणून मालकाने तगादा लावला. त्यामुळे त्याने पत्नीचे दागिने विकले व पैसेमालकास दिली. मात्र तुझ्याकडे अजून रक्कम बाकी आहे. ती आणून दे म्हणून त्याची मोटारसायकल सायाळकर यांनी ठेवून घेतली आणि जातीवाचक शिवीगाळ करून अपमानीत केले. हा अपमान सहन न झाल्याने गायकवाड याने १८ गस्ट रोजी सायाळकर यांच्या भोकर येथील घरासमोर सायंकाळी विषारी औषधप्राष केले.

परिसरात असलेल्या पप्पू काळे व सुनिल सांभाळकर यांनी त्याला ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तात्काळ नेले. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैधकिय अधिका-यांनी घोषित केले. याप्रकरणी सुरेशची पत्नी सीमा हिने फिर्याद दिल्यावरून कंत्राटदार बाबूराव सायाळकर व त्याचा सुपरवाझर दिगांबर या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कार आरोपातून पतीची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या विवाहितेकडे वकिलाची सेक्सची मागणी

News Desk

मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

swarit

४८ तासांत १० घरफोड्या

News Desk