HW News Marathi
क्राइम

नांदेड येथे स्फोटकाचा अवैध साठा जप्त, दोघांना अटक

नांदेड खडकी भागात पोलिसांनी एका जीपमधून स्फोटके जप्त केला आहे. स्फोटकेमध्ये 1400 काड्या व इडी जप्त केले आहे. याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखरून दोघांना अटक केली आहे. नथूराम साळवी आणि देविलाल साळवी असे आरोपीचे नाव आहेत

विशेष पोलिस पथकाला आज सकाळी एक जीप शहरानजीक खडकी भागात संशयास्पद स्थितीत आढळून आली. पथकाने या जीपची तपासणी केली असता जीपमध्ये सुपर पॉवर कंपनीची स्फोटके आढळून आली. यात स्फोटकाच्या चौदाशे काडया व इडी सापडल..आरोपीकडे स्फोटकाचे कोणतेही कागद पत्रे आढळून आले नाही. स्फोटके 42 हजार किमतीचे असल्याची माहिची पोलिसांनी दिली. ही स्फोटके कशसाठी आणले होते आणि कुठे नेत होते याची चौकशी पोलिस करत आहेत .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna

गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी

News Desk

बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला १० वर्ष कारावास

News Desk
Uncategorized

राहुल गांधीं बरोबर हात मिळवणी सर्वांसमोर करेन !

News Desk

अहमदाबाद – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबर हातमिळवणी करायची असेल तर ती सर्वांच्या समोर करेन असे सांगत राहुल गांधी बरोबर गुप्त बैठक झाल्याचे वृत्त पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल याने फेटाळून लावले आहे. एका खाजगी वृत्तवाहीनीने हार्दीक आणि राहुल यांची भेट झाल्याचे वृत्त दाखवले होते. शिवाय राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. त्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती.

हार्दीक पटेल यांना पाटीदार समाजाचा मोठा पाठींबा आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या प्रत्येक हालचालांवर सरकार आणि भाजपच्या नेत्यांचे लक्ष आहे. हार्दिकचा पाठींबा मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपचे नेतेही प्रयत्नात आहेत. मात्र हार्दिक आणि त्याच्या सहकार्यांचा कल हा सध्या तरी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट आहे. त्यातूनच राहुल आणि हार्दिकच्या भेटीचे वृत्त समोर आले आहे. शिवाय राहुल गांधी बरोबर हात मिळवणी करायची असेल तर ती सर्वां समोर करेन हे हार्दिक यांचे वक्तव्य सर्व काही सांगून जाते.

Related posts

जेलमधून सुटून आलेल्या संघ कार्यकर्त्याचा खून

News Desk

भाजपने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं!

swarit

ज्या भाषेत ते बोलतील त्याच भाषेत आम्हालाही उत्तर द्यावं लागेल

Seema Adhe