HW News Marathi
क्राइम

IPLवर सट्टा लावणारे तीन जण अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी नांदेड व भोकर येथे पत्रकारांशी साधलेल्या संवादात जिल्ह्यातील अवैद्य धंद्याची स्वच्छता मोहिम लवकरच राबविण्यात येईल असे सुतोवाच केले होते.त्यानूसार या कारवाई त्यांनी सुरुवात केली असून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन विभाग पोलीसांनी ६ मे रोजी सायंकाळी वेदांतनगर ,नांदेड येथील एका इमारतीत चालणा-या क्रिकेट सट्टा जुगार अड्ड्यावर छापा मारुन नांदेड येथील एक व भोकर येथील दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे.तर हा जुगार चालविण्यात सहभागी असलेला काँग्रेस पक्षाचा एक नेता व त्यास सहकार्य करणारे कोण ? यांचा शोध घेऊन पोलीस अधिक्षक हे त्यांना ही गजाआड करतील का ? अशी चर्चा होत आहे. सद्या आय.पी.एल. क्रिकेट सामन्यांचा फेवर सर्वत्र पसरला असून काही जुगारींनी या खेळास सट्टा जुगाराचे रुप देऊन लाखोचा जुगार लावण्याचा सपाटा लावला आहे.अशाच एका क्रिकेट सट्टा जुगार अड्ड्यावर लाखो रुपयाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन विभाग,शाखा नांदेडचे पो.नि.संदिप गुरमे यांना मिळाल्यावरुन त्यानी ६ मे २०१७ रोजी दुपारी पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांना माहिती दिली की,बिल्डर संजय बियाणी यांच्या बी.आर.जे. प्राईड गंगानगर,वेदांत नगर भागातील एका इमारतीत आय.पी. एल. क्रिकेट सामन्यांवर सट्टा जुगार खेळविला जात आहे. हे एैकून पोलीस अधिक्षक मीणा यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे,पोलीस कर्मचारी दशरथ जांभळीकर, दत्ता वाणी,शिंदे मुधोळकर,ज्ञानू बिडगर या सर्वांनी मालेगाव रस्त्यावरील बिल्डर संजय बियाणी यांच्या बी.आर.जे. प्राईड गंगानगर,वेदांत नगर येथील इमारतीस साफळा रचला.या साफळ्याची चाहूल लागताच त्या इमारत क्र. ३ जवळ उभी असलेली क्र.एम.एच .२६ ,२१८७ ही कार घेऊन कार चालकाने पलायन केले. पोलीस पथक हे पहिल्या माळ्यावरील संकुल क्र. ५ मध्ये गेले असता तेथे एल.ई.डी. टीव्ही वर हैद्राबाद (तेलंगणा ) येथील स्टेडीयमवर सुरु असलेल्या हैद्राबाद विरुद्ध पुणे यांचा क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण सुरु होते.तेथे अजमतखान मकसूदखान पठाण (२८), अनिसखान मकसूदखान पठाण (२५) हे दोघे रा.मुधोळ गल्ली, भोकर जि.नांदेड आणि दीपक शिवाजी माहूरकर (३०) रा.वेदांत नगर परिसर नांदेड हे सापडले.हे सर्त्यांव जण मोबाईलवरुन खेळावर लावण्यात येत असलेल्या सट्टा जुगाराचे आकडे घेत होते.या छाप्यात तिघांजवळ ७ मोबाईल व जुगार खेळविण्याचे साहित्य अशा १ लाख १० हजार ५० रुपयाचा मुद्देमाल सापडला.रोख रक्कम व उपरोक्त मुद्देमाल अशा २ लाख ५ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.परंतू मोठी रक्कम घेऊन या ठिकाणाहून एकाने पलायन केल्याचीही चर्चा होत आहे. छापा टाकण्यात आलेल्या या सट्टा जुगार अड्ड्यावरुन जुगारींचे घेतलेले मोठ्या रक्कमेचे आकडे अकोला येथील योगेश भय्या उर्फ बजरंगी शेठ यांच्याकडे पाठविली जात होती.तर नांदेड शहरा बाहेरील एका टेकडीवरील बिल्डींग मधून नांदेड व लातूर जिल्ल्यातील सट्टा जुगारींचे आकडे घेण्याचा अन्य एक मोठा अड्डा असल्याचे या छाप्यानंतर बोलल्या जात आहे.छापा टाकण्यात आलेल्या या अड्यावरुन कार घेऊन पलायन केलेल्या चालकाचे नाव शेख मुखीद रा.भोकर असून येथून रक्कम घेऊन ये जा करणा-या व्यक्तीचे नाव सुधीर पाटील ? आहे असे ही चर्चील्या जात आहे.सदरील क्रिकेट सट्टा जुगार अड्ड्यावर नांदेड येथील एका काँग्रेस च्या नेत्याचा वरदहस्त असून त्यास पोलीस विभागाशी संबधीत काही जण सहकार्य करत आहेत असे ही समजते. या सर्वांना शोधून पोलीस अधिक्षक हे जेरबंद करतील का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या छापा प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४६/१७ – मुंबई जुगार अधिनियम कायदा कलम ४ आणि ५ नुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.पो.नि.विनोद दिघोरे हे करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमधील मोटार सायकल चोरट्यांना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Aprna

दमनची अवैध दारू किनवटमध्ये जप्त  

News Desk

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

News Desk