HW News Marathi
क्राइम

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडल्यामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला (Iqbal Kaskar) जे. जे. रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आले आहे. कासकरची प्रकृती बिघडल्यामुळे जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षा विभागत दाखल करण्यात आल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. कासकरला काल (20 ऑगस्ट) दुपारी छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कासकरने दाऊदची धमकी देत खंडणी वसूली सुरू केली होती. कासकरविरोधात ठाणे पोलिसांन 2017 मध्ये प्रकरणी अटक केली होती. यानंतर कारकर न्यायलयीन कोठडीत आहे. गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा दाऊदशी  संपर्क झाल्याची कबुली कासकरने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली होती.

राष्ट्रीय तपास संस्थेने काही महिन्यांपूर्वी दाऊद आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरोधात एफआयआर नोंदवला होता. यात देशात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील होणार असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्थानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचा संबंध आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

News Desk

पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

News Desk

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, वहीत रेखाटले आत्महत्येचे चित्र

News Desk