HW News Marathi
क्राइम

दरोडा घालणाऱ्या 8 जणांच्या टोळीला एलटी मार्ग पोलिसांनी केली अटक

मुंबई | मुंबईतील भुलेश्वर परिसरातील अंगाडीयाच्या कार्यालयात घुसून दरोडा घालणाऱ्या 8 जणांच्या टोळीला एल टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. हा दरोडा घालणारे तरुण 25 ते 30 वयोगटातील असून पंचतारांकित हॉटेल मध्ये मौजमजा करण्यासाठी आणि घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आरोपीनी दरोडा घातल्याचे कबुल केले आहे.

29 मे 2018 रोजी मुंबईतील भुलेश्वर परिसरात अंगाडीयाचा व्यवसाय करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 8 जणांनी चाकूचा धाक दाखवत तोंडावर क्लोरोफार्म लावीत दरोडा घातला होता ज्यात तब्बल 1 कोटी 13 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर आरोपीनी मुंबई शहराबाहेर पळ काढला होता. या गुन्ह्याची नोंद एल टी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असता , आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या पोलीस टिम गुजरात मधील अहमदाबाद ,उत्तर प्रदेश , कनोज , आग्रा सारख्या ठिकाणी पाठविण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी या संदर्भात अंगाडीयाच्या कार्यालयातील कर्मचारी रिपन पटेल याला ताब्यात घेतले असता त्याने आपण मुख्य सूत्रधार असून गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीच्या तपासातून मिळालेल्या माहितीवरून भाविक पांचाळ , यास अटक केली असता अहमदाबाद येथून फरार होऊन गोव्यात ग्रांट हयात हॉटेल मध्ये लुटलेल्या पैशातून मौजमजा करणाऱ्या संतोष चौहान , जिगर पटेल , नरेंद्र जोउदान , यांना अटक करण्यात आली. आग्रा येथून दिपक भदोरीया तर अहमदाबाद येथून कल्लू शर्मा , आणि पंकज प्रजापती अशा एकूण 8 आरोपीना अटक करून पोलिसांनी 92 लाख रुपये हस्तगत केले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सतरा वर्षानंतर खूनातील आरोपी न्यायालयात हजर

News Desk

दलित तरुणीवर अत्याचार, काकूने बनवला व्हिडीओ

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Aprna
मुंबई

खातूंची कार्यशाळा आता नव्या जागेवर

swarit

मुंबई | सुप्रसिद्ध मुर्तीकार विजय खातू यांच्या निधनानंतर त्यांची कन्या रेश्मा खातू वडीलांच्या कलेचा वारसा जपत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून परळच्या सेंट्रल रेल्वे मैदानात प्रसिद्ध मुर्तीकार विजय खातू यांची कार्यशाळा होती. विजय खातू आणि सेंट्रल रेल्वे मैदान हे जणू एक समीकरण बनले होते. परंतु यंदा हे समीकरण पुर्णपणे बदले आहे. मुर्तीकार कुणाल पाटील यांना सेंट्रल रेल्वेचे मैदान मिळाले आहे. खातू यांना सेंट्रल रेल्वेचे मैदान नसल्याची बाब सार्वजनिक गणेश मंडळांना कळताच त्यांनी पुढाकार घेऊन कार्यशाळेसाठी जागा सांगितल्या होत्या. या सर्व मंडाळांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला. त्या विश्वासाला साजेल असे काम मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन अशी प्रतिक्रीया विजय खातू यांच्या कन्या रेश्मा खातू यांनी दिली आहे.

पण, आम्हाला कार्यशाळेसाठी जागा ऑर्थर नाका आणि परळ अशा दोन ठिकाणी जागा मिळाली असून लवकरच याठिकाणी आमची कार्यशाळा होणार आहे. सध्या आमच्या कारखान्यात बाप्पाच्या मुर्त्यांच्या कास्टिंगचे काम सुरु आहे. या दोन्ही जागेचा ताबा घेतल्यानंतर येथे बाप्पाच्या मुर्तींचे पुढील काम करणार असल्याचे मुर्तीकार रेश्मा खातू यांनी सांगितले.

दरवर्षी कार्यशाळेसाठी सेंट्रल रेल्वेच्या मैदानासाठी अर्ज करुन ही जागा रेल्वे प्रशासनाकडे मागीतली जाते. परंतु यंदा सेंट्रल रेल्वेचे हे मैदान खातू यांना मिळाले नाही. रेल्वे प्रशासनाने या मैदानाचे भाडे ६ लाख दर महिना इतके आकारले आहे. सेंट्रल रेल्वेचे मैदान आर्थिक दृष्टा आम्हाला परवडत नसल्यामुळे यंदाच्या वर्षी खातूंची कार्यशाळा येथे नसून ऑर्थर नाका आणि परळ या दोन्ही ठिकाणी असणार आहे.

यंदाही जुन्या आणि नवीन मंडळांची बुकिंग

दिवंगत विजय खातू यांच्या काळातील सर्व मंडळा पैकी आतापर्यंत ८० जुन्या मंडळांनी बुकिंग केली आहे. जुलै महिन्यापर्यंत उर्रवरित जुनी मंडळं देखील बुकिंग करतील असा विश्वास मुर्तीकार रेश्मा खातू यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवीन २० मंडळांनी बुकिंग केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जुन्या मंडळांचा विश्वास

प्रसिद्ध मुर्तीकार विजय खातू यांच्या निधनानंतर त्यांचा कलेचा वारसा त्यांची मुलगी रेश्मा जपत आहेत. चिंतामणी, चंदनवाडी, प्रगती संवा मंडळ, दुसरी खेतवाडी, तिसरी खेतवाडी, वसईचा महाराजा आदी प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांच्या मुर्ती विजय खातू साकारत होते. यंदाच्या वर्षी या मंडळांच्या मुर्ती विजय खातूंची कन्या रेश्मी खातू साकारणार आहे.

Related posts

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit

भाजपच्या ३ प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास बंदी

Gauri Tilekar

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

swarit