HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३२ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

अंबरनाथ : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे बैलगाडा शर्यतीवरून दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर 13 नोव्हेंबरला सुदामा हॉटेल परिसरात गोळीबार झाल. तब्बल 20 ते 22 राउंड बुलेट फायर करण्यात आल्या. या प्रकरणी आता 33 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी आरोपींवर मोक्का कलमांतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली आहे.

 

बोहनोली गावात आयोजित करण्यात येत असलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत चर्चा करण्यासाठी राहुल पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले होते, त्याचवेळी गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके व त्यांच्या साथीदारांनी राहुल पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे तर 23 जण फरार आहेत.

 

एफआयआरमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक कुणाल दिनकर पाटील यांच्या नावाचाही समावेश असून त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात टोळीचा म्होरक्या गुरुनाथ पंढरीनाथ फडके आणि त्याचे साथीदार राजकीय व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातत्याने बेकायदेशीरपणे घातक शस्त्रांसह टोळी जमा करून संघटित हिंसाचाराचा अवलंब करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरात खुनाचा प्रयत्न, धमकावणे, शिवीगाळ, मारहाण असे गंभीर गुन्हे घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

या टोळीच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी कायद्यानुसार कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी मोक्का कलमांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या ३३ आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

News Desk

ठाकरे सरकार ‘ब्लॅक लिस्टेट’ कंपन्यांना परीक्षांचे दिले कंत्राटे, पडळकरांचा आरोप

News Desk

पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी मनसेही पुढे सरसावली

News Desk