HW News Marathi
क्राइम

एनसीबीची मोठी कारवाई! 4 कोटी रुपयांचा 210 किलो गांजासह एका तस्कराला अटक

मुंबई | मुंबई एनसीबीने  (NCB) खोपोली येथे 4 कोटी रुपयांचा 210 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीने काल (1 सप्टेंबर) एका तस्करासह वाहनही जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला उच्च दर्जाचा गांजा मुंबई आणि लगतच्या भागात नेला जात होता. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा मुंबईचा रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या विविध भागात विशेषतः गोवंडी, मानखुर्द आणि इतर स्थानिक भागात गांजा आणि इतर अमली पदार्थांचा पुरवठा करत होता.

या अंमली पदार्थाची डिलिव्हरी आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून पुण्याजवळ काही ठिकाणी करायची होती. आणि मग उर्वरित पुढे गोवंडी, मुंबईला करायची होती. एनसीबीच्या पथकाने तस्करांच्या हालचालींची अधिक तपासणी करून पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या तस्कराचा आणि वाहनाचा योग्य वेळी माग काढला. एनसीबीकडून वाहनाची झडती घेण्यात आली ज्यामध्ये तपकिरी चिकट टेपने सीलबंद केलेले एकूण 210 किलो वजनाचे 98 पॅकेट्स सापडले.

मुंबईतील स्थानिक व्यापाऱ्यांना विक्रीसाठी गांजाचा तुटवडा होत असल्याने तातडीच्या ​​पुरवठ्याची मागणी होत होती. तस्कराची चौकशी केली असता, त्याने यापूर्वी अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे सांगितले. पुण्यातील मुख्य पुरवठादाराकडून हे ड्रुग्स आणले होते. गेल्या 4-5 वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात असून अनेक राज्यत अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभाग असल्याचे सांगितले.

गांजा लागवडीचे प्रमुख केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून मुंबई आणि लगतच्या अनेक स्थानिक पेडलर्सना डिलिव्हरी करण्यासाठी हा गांजा आणला जात होता. एनसीबीकडून याचा अधिक तपास केला जात आहे. तसेच अटक करणाऱ्यात आलेल्या या व्यक्तीच्या सिंडिकेटमधील इतर सहयोगी, इतर प्रतिबंधित वस्तूंचा साठा आणि पुरवठा, स्थानिक व्यापार्‍यांचा तपशील आणि भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या इतर अंमली पदार्थांशी संबंधित संबंधांबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

swarit

बाप-लेकीचा शोध घेताना दुसऱ्या खूनाच उलगडा

News Desk