HW News Marathi
क्राइम

नागपुरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या

नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण येथे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे.

रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावातील अवैध दारु बंद करण्याचे ग्रामरक्षक दलाला अधिकार

News Desk

HW Exclusive : उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; 250 कोटींचं कर्जफेड प्रकरणात समन्स

Chetan Kirdat

आदिवासी विकासमंत्र्यांच्याच तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk