HW News Marathi
क्राइम

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील थरार

नांदेड- मुंबई ते नांदेड जाणा-या मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी तलावर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. जसपाल दर्शनसिंग (वय २७ वर्ष), हरदिप गुरचरणसिंग (वय ३५ वर्ष) आरोपीचे नाव आहेत या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तपोवन एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी औरंगाबादहून सुटताच गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची एकच झाली.

यातच या दोघांनी बोगीत चक्क तलवार फिरवत जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. यात कुणीही जखमी झाले नाही. या प्रकारानंतर रेल्वे मनमाडला पोहोचल्यावर सतीश सराफ यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुढाल तपास पोलिस करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पती आणि पत्नीमध्ये वाद, फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट करून पतीने केली आत्महत्या

News Desk

नांदेड येथे गाेदावरी नदी काठी तरुणाचा खून

News Desk

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Aprna