HW News Marathi
क्राइम

पत्नीचे फेक अकाऊंट बनवून अपलोड केले अश्लील फोटो

हिंगोली पत्नीच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तायर करून अश्लील फोटो टाकून पत्नीचा बदनाम केल्याप्रकरणी पती विरोध्दात कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गणेश लिंगुराम मुंगावकर असे आरोपी पतीचे नाव आहे.

हिंगोली जिल्ह्यातील डोणवाडा येथील 20 वर्षीय तरूणीशी कळमनूरी येथील गणेश याच्याशी 2016 मध्ये लग्न झाला हेता. त्यानंतर पती नांदवत नसल्यामुळे ती माहेरी राहत होती. पुढे शिक्षणासाठी ती परभणीला गेली. गणेश कॉलेजमध्ये येऊन तिचा बदनामी केली. एवढ्यावरच न थांबता गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाइलवरही अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून अश्लील फोटो टाकून बदनामी केली. या सर्व प्रकाराला त्रस्त होऊन शेवटी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी गणेश लिंगुराम मुंगावकर याला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; मालाडमधून ३१९९ मोबाईल जप्त

Aprna

गोलंदाज बाद होतात तेव्हा, एकाच्या घरी चोरी, एकाच्या घरावर हल्ला

News Desk

अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी अलीगड पोलिसांनी ४ जणांना केली अटक

News Desk