HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

बच्चू कडू यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणी शिक्षा आणि जामीन

मुंबई | प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु, यानंतर बच्चू कडू यांना न्यायालयाने 15  हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला आहे.  बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) आयुक्ताला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यासाठी 2017 नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 वर्षाची शिक्षा सुनावली.

 

बच्चू कडू यांनी 2017 मध्ये दिव्यांगांच्या मागणीसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेतील अभिषेक कृष्णा नावाचे आयुक्त यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला. यानंतर बच्चू कडू यांनी आयुक्तांवर हात उचलला. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली.

 

नेमके काय आहे प्रकरण

नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही. यासाठी बच्चू कडू यांनी 2017 साली प्रहार संघटनेने महापालिकेवर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, बच्चू कडू आणि आयुक्त यांच्या शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून गेले. यानंतर बच्चू कडू यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उचलला. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत वाध सोडण्याचा प्रयत्न केला.

 

 

Related posts

‘माकडवस्थेत’ जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय? रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk

एस.टी. कर्मचारी संपास आणि प्रवाशांच्या होणार्‍या  त्रासास राज्य सरकारच जबाबदार- धनंजय मुंडे

News Desk