HW News Marathi
क्राइम

स्व:ताच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर येथील संत तुकडोजी नगर मध्ये राहणा-या एका जन्मदात्या नराधम बापानेच स्वत:च्या ८ वर्षीय मुलीवर सतत अनेकवेळा बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना समोर आली.पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन नराधम बापाविरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगणा राज्यातील बिद्राळी ता.बासर जि.निर्मल येथील रहिवासी असलेला माधव रामा येलेवाड (३५ ) हा गेल्या ३ वर्षापासून संत तुकडोजी नगर भोकर येथे सासुरवाडीत राहत आहे.पत्नीसह सासूरवाडीत राहून त्याने चहा विक्री हाॅटेलचा व्यवसाय त्याने थाटला.दरम्यानच्या काळात एप्रिल २०१७ पुर्वी माधव येलेवाड याने जीवे मारण्याची धमकी देत,धमकावत,वेळ प्रसंगी मारहाण करत त्याने स्वत:च्या मुलीवर सतत २ वर्षाच्या कालखंडात अनेकवेळा नैसर्गीक व अनैसर्गीक बलात्कार केला.ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवता शिकविण्यासाठी हयात खर्च केली.त्या महामानवाच्या नावाने असलेल्या नगरात असे अमानवी निषेधार्य कृत्य या नराधम बापानेच केले.ही बाब माधव येलेवाड याच्या पत्नीच्या निदर्शनास आल्याने तिने हाॅटेल व्यवसाय बंद केला व मुलीला माहेरी भोकर येथे आईकडे ठेऊन त्या नराधमास घेऊन सारसी बिद्राळी येथे राहण्यासाठी गेली.परंतू सदरील नराधम बापास गैरकृत्य करण्याची सवय लागल्याने तो दोन दिवसापुर्वी सासरी भोकर येथे आला व त्याने काल दि.३१आॅगस्ट रोजी मुलीला शाळेतून उचलून घरी नेले.तसेच चिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्या मेव्हूणीने (पत्नीच्या लहान बहिणीने )पाहिले व त्या या अमानवी कृत्यास विरोध करन मुलीची सुटका केली.यावेळी राग अनावर झालेल्या त्या नराधमाने मेव्हूणीलाच अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली व शरीर सुखाची मागणी केली.यावेळी सासूने सासूने नात व मुलीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याने सासूच्या हातावर गंभीर वार केला.यामुळे ती जखमी झाली. घडलेल्या सदरील गंभीर प्रकारामुळे ३१ आॅगस्ट रोजी रात्री नराधम माधव येलेवाडच्या पत्नीने भोकर पोलीस ठाणे गाठले व झालेला प्रकार कथन केला.तसेच १ सप्टेंबर रोजी रितसर फिर्याद दिली.तिच्या फिर्यादीवरुन रात्री ७:०० वाजताच्या दरम्यान भोकर पोलीसात जन्मदाता नराधम पिता माधव येलेवाड (३५) याच्या विरुद्ध नैसर्गीक व अनैसर्गीकरित्या बलात्कार केल्याचा गुरन २५०/१७ कलम ३७६(२)(F)(I)(M)(N) ३७७,५०४,५०६भादवि व कलम ४,६ लैंगीक अत्त्याचार बाल संरक्षण कायदा अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,पो.नि.आर.एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.साै.पुनम सुर्यवंशी या पुढील तपास करत आहेत. तसेच मेव्हूणीने दिलेल्या फिर्यादीवरुन अश्लील शिवीगाळ करुन मारहाण करत शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी गुरन २४८/१७ कलम २९४,३२३,५०४,५०६ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास जमादार सी.एम.साखरे हे करत आहेत.माणुसकीला काळीमा फासणा-या या कृत्याचा विविध स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून सदरील फरारी नराधम बापाच्या शोधार्थ भोकर पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आठ वर्षाच्या मुलाला सोडून आई पळाली

News Desk

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने आदिवासी नेत्यावर प्राणघातक हल्ला करून धिंड काढली

News Desk