HW News Marathi
क्राइम

चोरट्यांनी दरोड्याचं सोनं गहाण ठेवून विकत घेतला फ्लॅट

ठाणे – शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नौपाडा इथल्या राजपत ज्वेलर्समध्ये काही दिवसांपुर्वी मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी लुटलेला ऐवज एका पतसंस्थेत गहान ठेवून कर्ज घेतल्याची कबुली दिलीय.

गेल्या 26 मे रोजी रोहित पोर्टे (35) आणि सुनील पांडुरंग सपकाळ या दोघांनी नौपाडा इथल्या राजपत ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोहिदास पोर्टे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं सुनील सपकाळच्या साथीनं दरोडा टाकल्याची कबुली दिली. सुमारे एक कोटी रूपयांचा ऐवज लुटल्यानंतर या चोरट्यांनी एका पतसंस्थेत चोरलेली सोन्याची बिस्किटे गहाण ठेवून कर्ज घेतलं. त्या कर्जाच्या रकमेतूुन एक वन बीएचकेचा फ्लॅट घेतला. पोलिसांनी दरोड्यात चोरीला गेलेल्या 100 ग्रॅम वजनाच्या 35 बिस्किटांपैकी 28 बिस्किटं ताब्यात घेतलेली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदर्श प्रकरणात माजी लष्करी अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी  

News Desk

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

News Desk

…अन् मुलानं केला वडिलांचा खुन

News Desk