HW News Marathi
क्राइम

एटीएम सेंटर लुटण्यापूर्वीचं दरोडेखोर पकडले; चव्हाण-काळे टोळीच्या दोघांना अटक तर तिघे फरार

मुंबई : मुंबईच्या बोरिवली पूर्व (Borivali East) दत्तपाडा येथील एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चव्हाण-काळे टोळीतील दोन दरोडेखोरांना दरोडा टाकण्यापूर्वी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी (Kasturba Marg Police Station) अटक केली असून तिघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कुलूप तोडणासाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रासोबत पोलिसांनी दरोड्यात वापरण्यात येणाऱ्या वस्तूही आरोपींकडून जप्त केल्या आहेत.

 

दिवाळीनिमित्त कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलिसांची गस्त वाढवली आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री बीट मार्शलवर गस्त घालत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) वाळुंजकर यांना काही दरोडेखोर बोरिवली पूर्व दत्तपाडा बँकेचे एटीएम (ATM) लुटण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली. वाळुंजकर यांनी वरिष्ठांना कळवले व त्यांच्या आदेशानुसार त्यांनी पोलीस पथकासह सापळा रचला. दुपारी 3.15 वाजता 5 जण बँकेत आले आणि एटीएम जवळ थांबले. पोलिसांना संशय आल्याने ते सर्वजण पळू लागले. ५ पैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, उर्वरित 3 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी  दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी हे सराईत दरोडेखोर आहेत. ते चव्हाण-काळे टोळीचे सदस्य आहेत. करण चव्हाण आणि प्रकाश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे अन्य साथीदार गोपी चव्हाण, गोविंद काळे, आणि राहुल काळे हे फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपहरण झालेल्या मुलाची चार तासात सुखरुप सुटका; जालना पोलिसांची कारवाई

News Desk

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

News Desk

एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन

News Desk