HW News Marathi
क्राइम

सराईत घरफोडी करणारा आरोपी अटक

मुंबई धारावी येथे घरपोडी करताना् सराईत आरोपीला रंगे हात धारावी पोलिसांनी अटक केली आहे. रियाज शेख 36 असे आरोपीचे नाव आहे. मुळचा हा कर्नाटकचा असल्याची माहिती पोलिसांनी. आरोपी हा फक्त घरोफोडी करण्यासाठीच मुंबईत आला होता. रियाजवर कर्नाटक येथे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक पोलिस त्याच्या मागावर होते.

त्यामुळे त्याने वर्षभरापासून मुंबईत घरफोडी करायला सुरुवात केली होती. घरफोडी केल्यानंतर पुन्हा हा आरोपी त्याच्या मूळ गावी परतत होता. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी हा आरोपी धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील संतोष वाइन्स शॉपजवळ उभा होता. याच वेळी धारावी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना या आरोपीबाबत संशय वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले.

मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ २५ हजारांची रोकड व दारूच्या अनेक बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

swarit

आईच्या कुशीतून निसटून मृत्युच्या कुशीत

News Desk

​पोलिसाच्या चाकुहल्यात सात जण जखमी

News Desk