मुंबई | “कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, उसा उलट सवाल अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हीने मुंबई पोलिसांना केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदच्या तोकडे कपडे घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरते, असा आरोप करत मुंबई पोलिसात तक्रार केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठविली होती. या पार्श्वभूमीवर उर्फी जावेद आज (14 जानेवारी) मुंबईतील आंबोली पोलिसांकडे जबाब नोंदविला आहे. यावेळी उर्फीने तिचे फोटो काढणाऱ्या कॅमेरा मॅन किंवा पापाराझी यांच्यावर तिचे फोटो काढणे आणि व्हायरल करण्याला आरोप केला आहे.
उर्फी जावेद पोलिसात जबाब नोंदविताना म्हटले, “मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या पसंदीने कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मला राज्यघटनेने दिलाय. मी जे कपडे घालते ते माझ्या पसंदीने घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाहीये. मी जे कपडे घालते ते माझ्या कामाच्या गरजेनुसार घालते. त्यावरून माझे फोटोशूट होत असते. कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, असा उलट सवाल केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.