HW News Marathi
क्राइम

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे | पुण्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या सबजेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली आहे. दरोडा आणि बलात्कार प्रकरणात अटकेत असणा-या आरोपीने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मूळचा श्रीगोंदा येथील रहिवासी आसणारा सुलदास उर्फ कुक्या काळे असे आरोपीचे नाव असुन मंचर पोलिसांनी त्याला अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. सुलदासने गेल्या वर्षी लांडेवाडी येथील घरात दरोडा टाकून ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता त्यामुळे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आलिया भटला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

News Desk

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk

पुण्यातील ओशो आश्रमात अनुयायांचा प्रवेश; पोलिसांकडून लाठीजार्च

Aprna
महाराष्ट्र

एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के वाढ

News Desk

धुळे | एसटीने प्रशासनाने तिकीट दराबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढीचा निर्णय एसटीने प्रशासनाने घेतला आहे. १५ जून (आज ) मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अम्मल बजावनी होणार असुन हे नवे दर लागु होणार आहेत. दरवाढीच्या या निर्णयामुळे १५ ते १८ जून या कालावधीत देण्यात आलेल्या सर्व एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत तसच सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दररोज डिझेलचे वाढते दर आणि नुकतीच एसटी कर्मचा-यांची करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीने हा निर्णय घेतला आहे. नेहमीच सुट्ट्या पैशांवरुन प्रवासी आणि वाहकांदरम्यान वादावादी होते त्यामुळे याच्यावर ऊपाय म्हणुन यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी कमी होईल असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

Related posts

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

Aprna

फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळेची राज ठाकरेंनी घेतली भेट!

News Desk

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

swarit