HW News Marathi
क्राइम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुष्णकुंज या निवासस्थानाबाहेर एका शिक्षकांने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा शिक्षक रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. शिक्षकांवर होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची माहिती त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिली आहे.

रहेजा कॉलेजमध्ये कला विभाग बंद करत आहे. कला विभाग बंद होऊ नये. यासाठी गेल्या चार वर्षापासून हा शिक्षक लढा देत आहे. याबदल संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन ही कोणताही उपयोग झाला नसल्याचा आरोप या शिक्षकाने केला आहे.

आज दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंज बाहेर पोहचला.आपले आवडते नेते राज ठाकरे यांच्या घराबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या शिक्षकाला हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सारा तेंडूलकर शरद पवारांवर टिका करते तेंव्हा….

News Desk

श्रध्दा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk