HW News Marathi
क्राइम

इज्तेमात सहभागी झालेला कर्मचारी निलंबित

औरंगाबाद- उत्तरप्रदेशातून औरंगाबादेत सरपंच सोबत आलेल्या पोलिस कर्मचा-याला इलाहाबाद पोलिस अधिक्षकांनी निलंबित केले आहे.

इलाहाबाद जिल्ह्यातील सोराॅव तालुक्यातील सरपंच इम्तीयाज समी अहमद यांच्या सोबत त्यांचा शस्रधारी अंगरक्षक आरिफ मो.हसन अहमद रा.धामपुर ता.जखनिया हा इलाहाबाद पोलिस मुख्यालयातीलस कर्मचारी आहे या कर्मचारीला आहे. सरपंच इम्तीयाज समी अहमद यांच्या कुटुंबियाची हत्या एका सामुहिक हत्याकांडात झाली होती.त्यामुळे सरपंच अहमद यांना इलाहाबाद पोलिसांनी पोलिस संरक्षण दिले आहे. म्हणून पोलिस कर्मचारी आरिफ अहमद याची पोलिस मुख्यालयाकडून सरपंच यांच्या अंगरक्षक म्हणून नियुक्ती केली होती.पण आपली हद्द सोडून जाताना मुख्यालयाला कळवावे लागते हा नियम आरिफ मोहमदला माहित नव्हता.कारण तो आठच महिन्यांपूर्वी पोलिस दलात ट्रेनिंग संपवून रुजू झाला होता.शनिवारी दुपारी पोलिस कर्मचारी आरिफ मोहमंद हा स्टेनगन घेऊन इज्तेमाच्या ठिकाणी फिरतांना वाळूज पोलिसांना आढळला.पोलिस निरीक्षक सतीष टाक यांनी आरिफला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. व इलाहाबाद मुख्यालयाशी संपर्क साधून आरिफ विषयी अधिक माहिती जाणून घेतली.त्या माहितीत आरिफ याने वरिष्ठ अधिकार्‍यांना न सांगता औरंगाबाद गाठले होते.हा हलगर्जीपणा ज्यावेळेस इलाहाबाद अधिक्षकांना कळाला तेंव्हा त्याचे तात्काळ निलंबन केल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांना दिली.त्याची स्टेनगन जप्त करण्यात आली असून सरपंच इम्तीयाज अहमद सहित पोलिस कर्मचारी आरिफ इलाहाबाद पोलिसांकडे रवाना केले. दरम्यान रविवारी इज्तेमातील स्वयंसेवकांनी चौघांना चोरटे असल्याच्या संशयावरुन मारहाण करत डांबुन ठेवले व वाळूज पोलिसांना माहिती दिली.चौघांपैकी एकाला स्वयंसेवकांच्या मारहाणीत जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.या प्रकरणात मयताची ओळख अद्यापही पटली नाही.त्याचा मृृ तदेह घाटी रुग्णालयाच्या शवागृृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले तर उरर्वित तिघे मुबारक हसन तिंबोळी(३४) रा.जोगेश्वरी मुंबई, अन्वरखान इमामखान (३९) भवानीपेठ पुणे,शे.अकील उर्फ सालणरोटी(१८) रा.मालेगाव औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?”- जयंत पाटील

News Desk

अलिगड पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर

swarit

गळफास घेवून तरुण शेतक-याची आत्महत्या

News Desk
महाराष्ट्र

‘प्रयास’च्या सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk

नाशिक | नाशिक पोलीस आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यामाने ‘प्रयास’च्या माध्यमातून लोकांना वाहतुकीचे नियमाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही दलातील १२ सायकल स्वार या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यात ६ सायकल स्वार हे नाशिक पोलीस दलातील आहेत, तर ६ सायकल स्वार भारतीय हवाई दलाचे आहेत.

‘प्रयास’मध्ये ‘मी, आरोग्य आणि रस्त्याच्या सुरक्षेसाठी समर्थन करतो’ आणि ‘मी वाहतूक नियमाचे पालन करत आहे, मी बदलत आहे.’ अशा लक्ष्यवेधी वाक्य असलेले पत्रक तयार करण्यात आले आहे. यातून देखली लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाचे पालन जनजागृती होईल.

नाशिक शहारातून २२ फेब्रुवारीपासून या सायकल रॅलीची सुरुवात झाली, असून नागपूर आणि पुन्हा नाशिक असा साडेपंधराशे मीटरचा प्रवास करुन हे सायकल स्वार आले आहेत. या सायकल रॅलीच्या माध्यमातून लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे. तसेच वाहतुकीचे नियमविषयी तरुन पिढीमध्ये जनजागृती करणे, हा या मागचा उद्देश आहे. या सायकल स्वारांनी प्रवास करताना अनेक शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यलयात जावून लोकांना वाहतुकीच्या नियम आणि आरोग्या बदल माहिती देऊन त्यांचे पालन करण्याचे आव्हान केले आहे. या सायकल स्वारांमध्ये वर्धा शहर पोलीस अधिकारी देखील देखील ‘प्रयास’मध्ये सहभागी झाले होते.

तसेच या सायकल स्वारांनी वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी तयार केलेले लक्ष्यवेधी प्रत्रक या प्रवासात लोकांमध्ये यांचे वाटप केले आहे. ‘प्रयास’ माध्यमातून दोन्ही दलात समन्वयात वाढत तर होणारच आहे, यातून लोकांना चांगला संदेश देण्याचा ‘प्रयास’ या दोन्ही दलाच्या वतीने करण्यात आला आहे.

Related posts

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

News Desk

कोल्हापूर, सोलापूर, जळगावकरांसाठीही लवकरच विमानसेवा!

News Desk

‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका

News Desk