HW News Marathi
क्राइम

बॅगेत मृतदेह टाकून मुलगी, जावाई फरार

नागपूरमध्ये मध्यरात्री एका बॅगमध्ये पुरूषाचा मृतदेह आढळल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूण आणि तरूणी मोठी बॅग घेऊन दुर्गानगर स्टॅंडवरून रिक्षा पकडली. रिक्षा चालकाला रेल्वे स्टेशनला सोडण्यास सांगितले. रिक्षा चालकाला संशय आल्याने बॅगेत काय आहे असे विचारणा केली. दोघेही घाबरल्याने तरुण-तरुणी बॅग माटे चौकात टाकून पसार झाले. रिक्षाचालकाने राणा प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.

सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास बॅग पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. यावेळी ती उघडून पाहिली असता त्यात 40 वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे ओळख पटली असून मानसिंग शिव असं मयताचं नाव आहे. फरार तरूणी आणि तरूण हे दोघेही मयत व्यक्तीचे मुलगी आणि जावाई असल्याचे समोर आले आहे. या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार

News Desk

मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

News Desk

बचपन बचाव आंदोलन मुलांचे संरक्षण करणारे कायदे सक्षम करण्याची मागणी

swarit