HW News Marathi
क्राइम मुंबई

मालकाच्याचं घरी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक; 46 लाखांच्या मालमत्तेस बिहारमधून घेतले ताब्यात

मुंबई | कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर भागात आपल्या मालकाच्या घरी डल्ला मारून तब्बल 41 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरून फरार जहलेल्या 34 वर्षीय नोकराला गुन्हे शाखेेने अवघ्या 24 तासात बिहार येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीकांत चिंतामणी यादव असून तो बिहारच्या जमुई जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी हा मागील 12 वर्षापासून तक्रारदाराच्या घरी हाऊस किपिंगाचे काम करत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोकराने तक्रारदाराच्या राहत्या घरातील कपाटाची बनावट चावी बनवून लॉकर उघडले आणि त्यातून अंदाजे 41 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याची दागिने, नाणी, बिस्कीट, घडयाळे व रोख रक्कम असे चोरी करून फरार झाला. या विरोधात फिर्यादी यांचे सांगण्यावरून कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू करून तांत्रिक तपास व गोपनीय बातमीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.आरोपी हा मुळ गांवी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावरून आरोपीचा शोध घेणेकामी मा. वरिष्ठाच्या परवानगीने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथक बिहार राज्यात पाठवण्यात आले.व येथील स्थानिक पोलीस ठाणे, चंद्रमंडी यांच्या मदतीने गुन्हयातील आरोपीला २४ तासात अटक करण्यात आली.वा आरोपीकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली. अटक आरोपी हा सध्या पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामा कामतही नंबर वन

News Desk

एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात 

News Desk

धारावीत पोलीसांच्या संरक्षणासाठी ‘सॅनिटाझेशन टेंट’ची सोय

News Desk