HW News Marathi
क्राइम

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एकाच दिवसात दोन गोळीबारीच्या घटना घडल्याने कायदा, व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CMEknath Shinde) यांच्या ठाणे (Thane) शहरात एकाच दिवसात दोन गोळीबारीच्या घटना घडल्याने खळबळ माजली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाण्यातील घंटाळी देवी रोडवर आज (21 ऑक्टोबर) सकाळी गोळीबार झाली. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून ही घटना ताजी असतानाच ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी गोळीबाराची घटना घडली. दिवाळीच्या पहिल्यात दिवशी गोळीबारीच्या दोन घटनांनी पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ठाण्यामधील लोकमान्य नगर पाडा नंबर 4 मध्ये गोळीबारीची घटना घडली असून आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास गोळीबारीची घटना घडली. या गोळीबारीत गणेश जाधव ऊर्फ काळ्या गण्या असे नाव असलेला व्यक्ती जखमी झाल्याचे नाव आहे. या गोळीबारीत जखमी झालेल्या गणेश जाधव यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान ठाण्यामधील घंटाळी मंदिरात रोड परिसरात झालेल्या गोळीबारीत तीन राऊंड्स फायरिंग करण्यात आली आहे. यात एका व्यक्तीला गोळी लागली असून या गोळीबारीत एक जण गंभीर जखमी झालेला आहे. या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत काडतूस सापडले. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात गोळीबारीच्या घटना सुरू आहेत. यापूर्वी 17 सप्टेंबरला ठाण्याच्या हद्दीतील चितळसर पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता. परंतु, सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही. तर 7 ऑक्टोबरला आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करण्यात आली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुर्णा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी दरम्यान दगडफेक अनेकजण जखमी

News Desk

महिलेवर शिंदवणे घाटात सामुहिक बलात्कार

News Desk

दोन हजार रूपये लाच घेतल्या प्रकरणी वनपालास ४ वर्ष कारावास

News Desk