HW News Marathi
क्राइम देश / विदेश

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

सर्वात लोकप्रिय मीडिया प्लेयर सॉफ्टवेअर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. MediaNama च्या अहवालानुसार, VLC Media Player वर भारतात बंदी घालण्यात आली आहे, परंतु हे जवळपास 2 महिन्यांपूर्वी घडले. दरम्यान, कंपनी किंवा भारत सरकारने या बंदीबाबत कोणताही तपशील अद्याप उघड केला नाही.

काही आवाहलानुसार देशात VLC मीडिया प्लेयरवर बंदी घालण्यात आली आहे. ह्या बाबत जे कारण समोर येते आहे त्या नुसार भारतात सायबर हल्ल्यांसाठी चीन पुरस्कृत हॅकिंग ग्रुप सिकाडा ( Cicada ) या VLC मीडिया प्लेयर ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करत होता. काही महिन्यांपूर्वी, सुरक्षा तज्ञांना असे आढळून आले की Cicada दीर्घकाळ चाललेल्या सायबर हल्ल्याच्या मोहिमेचा भाग म्हणून मालवेअर लोडर तैनात करण्यासाठी VLC Media Player वापरत करत आहे.

ह्या बंदी बाबत कंपनी किंवा भारत सरकारने अद्याप अधिकृत माहिती दिली नसली तरी ट्विटरवरील काही युझर्सनी या निर्बंधाची करणे समोर आणली आहेत. गगनदीप सप्रा नावाच्या ट्विटर युझर्सनी व्हीएलसी वेबसाइटचा स्क्रीनशॉट ट्विट केला ज्यामध्ये वेब साईटला व्हिसिट केल्या नंतर आलेला मजकुरामध्ये असे म्हटले आहे “आयटी कायदा, 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे”.

सध्या देशात व्हीएलसी मीडिया प्लेयर वेबसाइट आणि डाउनलोड लिंकवर बंदी आहे. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा आहे की देशातील कोणीही ह्या वेब साईट चा वापर करू शकत नाही. समोर आलेल्या माहिती नुसार VLC Media Player एसीटी फायबरनेट, व्हीआय (VI – Vodafone Idea) यासारख्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवरूनही हटवण्यात आलं काही मीडिया रिपोर्टमध्ये बोललं जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने या ॲपवर बंदी आणली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आलं आहे.

भारतात VLC Media Player वर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, VLC कंपनीकडून
अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

2020 मध्ये, भारत सरकारने PUBG Mobile, TikTok, Camscanner आणि बरेच काही यासह शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घातली. खरं तर, BGMI डब केलेल्या PUBG मोबाइल भारतीय आवृत्तीवर देखील अलीकडेच भारतात बंदी घालण्यात आली आहे आणि Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आली आहे. हे अॅप्स ब्लॉक करण्यामागचे कारण म्हणजे सरकारला भीती होती की हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा डेटा चीनला पाठवत आहेत.

आयटी कायदा 2000 नुसार, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, चोरून किंवा अप्रत्यक्षपणे युजरच्या संमतीशिवाय वापरणे किंवा ती इतरांना देणे, विकणे बिघाड करणे, हॅक करणे, व्हायरस पसरवणे, ओळखीच्या पुराव्यांचा गैरवापर करणे किंवा त्यासंदर्भातील माहिती चोरणे किंवा विकणे हा गुन्हा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! शरद पवार घेणार अमित शहांची भेट!

News Desk

नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते | मनमोहन सिंग

swarit

‘आप’ने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची केली घोषणा

Aprna