HW News Marathi
क्राइम

वीस लाख रुपये किमतीची कातडी जप्त

अहमदनगर – नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंशाची दोन हजार कातडी जप्त करण्यात आली. या कातडीची किंमत साधारणपणे २० लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी कातडीची तस्करी करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, व्यवहारातील दलाल पोलिसांना पाहाताच पसार झाला. याप्रकरणी नेवासे पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन शेवगाव पोलीस उपाधीक्षक अभिजित शिवतारे व परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सोनाली कदम यांच्या पथकाने गुरुवारी रात्री सलाबतपूर येथे गोवंशाच्या कातडीची खरेदी-विक्री होणार असतांनाच छापा टाकला. यात विनापरवाना कत्तल केलेल्या जनावरांची २० लाख रुपये किमतीची दोन हजार कातडी मिळून आली. पोलिसांनी कातडी ताब्यात घेवून तस्करी करणारे बनू कालिम शेख, आजम मन्नू शेख, तोहफिक रहीम बक्ष (सर्व रा. सलाबातपुर) या तिघांना अटक केली. मात्र, दलाल बाबू सय्यद पोलिसांना पाहाताच अंधाराचा फायदा घेवून पसार झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात भरदिवसा गोळीबार, विद्यापीठ चौक परिसरातील घटना

News Desk

तासगावमधील सराफासह चौघे तडीपार!आणखी रडारवर

News Desk

नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

News Desk