HW News Marathi
क्राइम

असह्य विवाहितेवर वारंवार बलात्कार

ठाणे- एका असह्स विवाहितेवर शेजारी राहणाऱ्या दुकानदाराने वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून संबधीत दुकानदारास अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

गोवेनाका परिसरात अशोकचे किराणा दुकान आहे. पीडित महिलाही त्याच परिसरात राहणारी आहे. किराणा दुकान असल्याने पीडिता त्याच्या दुकानातून दैनंदिन लागणारे गरजेचे साहित्य विकत घेत असे, त्यातून त्यांची ओळख झाली. त्यानंतर मे २०१६ रोजी पीडित महिलेला भूलथापा देवून तो राहत असलेल्या टेमघर परिसरातील त्याच्या घरी नेले. यावेळी घरात कोणी नसताना त्याने तिच्यावर २ ते ३ वेळा बलात्कार केला.

या घटनेची कुठे वाच्यता केली तर तुझी बदनामी करेन अशी तिला धमकी दिली. त्यानंतर पुन्हा १९ जुलैला त्याच्या घरात कोणी नसताना पीडित महिलेला धमकी देत घरी नेवून बलात्कार त्याने केला. यामुळे पीडित महिलेने त्याच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेत अशोकविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळीच्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk

कर्जत वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्याला ५०हजारांची तर नेरळच्या शाखा अभियंत्याला १० हजारांची लाच घेताना अटक

News Desk

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास NIA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

Aprna