HW News Marathi
क्राइम

आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड

औरंगाबाद – पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. जाधव यांना दोन गुन्ह्यामध्ये प्रत्येक एक वर्ष आणि पाच हजार रूपये असा दंड ठोठावण्यात आला आहे.

तत्कालीन मनसे आमदार जाधव यांनी पोलिसांना मारहाण केली होती. ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला होता. अजिंठा वेरुळच्या दौऱ्यावर असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव प्रयत्नशील होते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जाधव मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

वेरुळकडे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जाधव यांनी गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. ही गाडी अडवणाऱ्या पोलीस आणि कॉन्स्टेबलच्या अंगावरही गाडी घातल्याचा दावा पोलिसांचा होता. त्यानंतर काही अंतरावर पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कोकणेंच्या कानशिलात लगावल्याचा आरोप झाला होता. याशिवाय जाधव यांनी कोकणेंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बंदोबस्ताला असणाऱ्या दोन महिला कॉन्स्टेबल्सनाही मारहाण केली होती. असा आरोप आमदार जाधव यांच्यावर आहे.

दरम्यान, आमदार जाधव यांच्याशी महाबातमीच्यावतीने संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिम येथे दलित महिलेची हत्या

News Desk

सतरा वर्षानंतर खूनातील आरोपी न्यायालयात हजर

News Desk

…म्हणून तिने जाळून घेऊन केली आत्महत्या

News Desk