HW News Marathi
क्राइम

गरीब मुलांना परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट पासपोर्ट, व्हिसा बनविणारे रॅकेट गजाआड

मुंबई : गरीब कुटुंबातील मुलांना बनावट पासपोर्ट व व्हिसाच्या आधारावर परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पंजाबातील चार शाळकरी मुलांना युरोपमध्ये घेऊन जाणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

आरिफ शफी फारुकी (वय ३८), राजेश बालाराम पवार (४६) व फातिमा फरीद अहमद (४८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ हजार युरो, पासपोर्ट, व्हिसा व तिकिटे जप्त केली आहेत.

या प्रकरणातील फारुकी हा दलाल असून अन्य दोघे जण अल्पवयीन मुलांचे पालक असल्याचे भासवून त्यांना परदेशात घेऊन जात होते. गरजू कुटुंबातील मुलांचे अपहरण करणे किंवा त्यांना विकत हे रॅकेट त्यांना परदेशात पाठवत होते. रॅकेट चावणाऱ्या आणखी एकाचा पोलिस शोध घेत आहेत. सुटका करण्यात आलेली चारही मुले १४ ते १६ वयोगटातील असून मूळची पंजाबमधील अमृतसर येथील आहेत. मुलांची तस्करी करणाऱ्या दलालाकडून चार मुलांना परदेशात नेण्यात येणार असल्याची माहिती जबरी दरोडाविरोधी पथकाला मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फलाहारी बाबावर बलात्काराचा गुन्हा

News Desk

श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

Aprna

मिलिंद एकबोटेविरधात अटक वॉरंट जारी

swarit