HW News Marathi
क्राइम

तो सिनेमा पाहून आला, काही वेळात रेल्वेरुळावर मृत्यू

जळगाव- शहरातील सिनेमागृहात सिनेमा पाहून घरी आल्यानंतर कपडे बदलवून पुन्हा रात्री घराबाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नरेश राजेंद्र बाविस्कर (वय 19, रा. कांचन नगर) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यू कसा झाला, याचा उलगडा होत नाही. नरेश हा शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता सिनेमा पाहण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. सिनेमापाहून आल्यानंतर रात्री बारा वाजता घरी आला. त्यानंतर घरात कपडे बदल केले व नंतर गल्लीत मित्रांसोबत दीड वाजपर्यंत गप्पा केल्या. यावेळी घरातील सर्व लोक झोपी गेलेले होते. सकाळी नरेश घरात दिसला नाही व त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला असता प्रजापत नगराजवळ भुसावळ मार्गावर रेल्वे खांब क्र.421/1 ते 420/33 दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली की त्याची काही कारणस्तव हत्या करण्यात आली, याचा पोलिस तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अवैद्य दारू विक्री करणा-यांवर कारवाई , चार आरोपी अटक

News Desk

संजय दत्तला कुठलीही सवलत नाही

News Desk

सीबीआयच्या नावाखाली खंडणी मागणा-या जोडीला अटक

News Desk
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

समलैंगिकता गुन्हा नाही, न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

News Desk

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna