HW News Marathi
क्राइम

दोघांच्या डोळ्यात मिरची,अं,गावर पेट्रोल टाकून दरोडेखोरांनी १ लाख २३ हजार रुपये लुटले

उत्तम बाबळे
नांदेड :- भोकर – तामसा रस्त्यावरील भोकर तालुक्याच्या सिमेवरील गणेश खांडी उतारावर गोड तेल विक्री करुन रक्कम घेऊन हदगावकडे जाणा-या टेंपोला मोटार सायकलने आलेल्या दरोडेखोरांनी अडविले व त्या टेंपोतील एकाच्या डोळ्यात मिरची भूकटी टाकली,तर दुस-यास जबर मारहाण करत तिस-याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटऊन देण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळील १ लाख २३ हजार रुपयाची लुट करुन दरोडेखोरांनी मोटार सायकल वरुन धुम ठोकली.ही घटना २० जुलै रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी तामसा पोलीसांत धाडसी दरोड्याचा ( रोड राॅबरी)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव येथील गोड तेल व्यापारी श्रीनिवास दमकोंडवार यांच्या तेल मिल मधून जिल्ह्यात तेल विक्री केली जाते.त्यानूसार नेहमी प्रमाणे एम.एच.२६ ए.डी.६०८२ क्रमांकाच्या त्यांच्या टेंम्पोचे चालक अमोल देविदास जाधव (२५) रा. भानेगांव ता.हदगाव,सेल्समन लखन व त्यांचा सहाय्यक फारुख भाई यांनी नेहमी प्रमाणे गोड तेलाचे डब्बे, अर्धा,एक,पाच व दहा लिटर पॅकींग पाॅकेट असे १४० लिटर आणि सोयाबिन तेलाचे १८० लीटर चे तिन बॉक्स उपरोक्त टेंम्पोत भरुन दि.२० जुलै २०१७ रोजी उमरी जि.नांदेड येथील व्यापार पेठेत विक्रीसाठी नेले.तो तेथे विक्री करुन भोकर – तामसा रस्त्याने घरी परतत असतांना रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या टेंम्पो भोकर शहरापासून ७ कि.मी.अंतरावरील गणेश खांडी उतारात येताच समोरुन दोन मोटार सायकल वरुन तोंडांला कपडा बांधलेले चार जण आले व त्यांनी टेंम्पोची समोरची काच फोडून टेंम्पो अडविला.यानंतर क्षणाचाही विलंब न करता टेंम्पो चालकाच्या डोळ्यात लाल मिरचाची भुकटी टाकली व मारहाण करुन बाहेर काढले.तर सहाय्यक फारुख भाई यास जबर मारहाण केली आणि सेल्समन लखन यास मारहाण करत त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटऊन देण्याची धमकी देत त्याच्या जवळील १ लाख २३ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हसकाऊन घेतली.रक्कमेची बॅग हाती लागताच या चार दरोडेखोरांनी सिनेस्टाईल मोटार सायकल वरुन धुम ठोकली. या दरोड्याची माहिती मिळताच दरोडेखोरांच्या नाकेबंदी व शोधार्थ तामसा आणि भोकर पोलीस पथक तात्काळ रवाना झाले.हे घटनास्थळ भोकर पासून जवळ असल्याने पथक लवकर जाणे शक्य होते.परंतू भोकर पोलीसांना गणेश खांडी एैवजी सिताखांडी हे घटनास्थळ असल्याची चुकीची माहिती मिळाल्याने पो.नि.संदिपान शेळके,सहा.पो.नि.सुरेश भाले व कर्मचा-यांचे पथक प्रथम सिताखांडीकडे रवाना झाले.नंतर गणेश खांडी हे घटनास्थळ असल्याचे समजल्याने भोकर व तामसा दोन्ही कडून पोलीस पथकांनी पाठलाग करुन नाकेबंदी केली.परंतू मोटार सायकल स्वार दरोडेखोरांनी खुष्कीच्या मार्गे धुम ठोकली व पोलीसांना गुंगारा दिला.या प्रकरणी चालक अमोल जाधव यांनी फिर्याद दिल्यावरुन तामसा पोलीसात त्या चार अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध जबरी दरोड्याचा (रोड राॅबरी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक महिन्यानंतर या रस्त्यावर धाडसी दरोड्याची घटना घडली असल्याने या मार्गे जाणा-या नागरीक व व्यापा-यांत मोठी दहशत पसरली आहे.दरम्यानच्या काळात तामसा पोलीस ठाण्यास व घटनास्थळी भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट दिली आहे.तर सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पो.नि.गोमारे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करत असून या दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे आव्हान तामसा पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखा,विशेष पोलीस पथक व आदींपुढे उभे आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

News Desk

तासगावमधील सराफासह चौघे तडीपार!आणखी रडारवर

News Desk

अपहरणाच्या भीतीने तरुणीची भरधाव रिक्षातून उडी

News Desk