HW News Marathi
क्राइम

दुसरे लग्न करणा-या नवरोबासह सासू-सासना अटक

ठाणे: घटस्फोट झाला नसतानाही दुसºया महिलेशी विवाह केल्याप्रकरÞणी ठाणे सत्र न्यायालयाने उल्हासनगर येथील राहुल केसवानी या नवरोबालात्याच्या पालकांसह अटक करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगिता खलिपे यांच्यासमोर या व्यक्तीने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळताना त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या तिघांनाही अटक करण्याचे आदेश दिले. पीडीत महिला विज्ञान शाखेची पदवीधर असून विवाह नोंदणी करणाºया संकेतस्थळावरून या महिलेने आपल्यासाठी राहुलची निवड केली होती. त्यावेळी तिला आपला घटस्फोट झाल्याचे राहुलने सांगितले होते. लग्न झाल्यानंतर हे दोघंही दुबईला गेले. दुबईमध्येही तिला राहुलच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे तिने परत आधीच्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिच्या सासू-सासºयांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर २३ मार्चला राहुल काही न सांगता घरातून निघून गेला. त्यानंतर या महिलेने पुन्हा राहुलच्या पहिल्या पत्नीची भेट घेतली. त्यावेळी तिला अजून घटस्फोट मिळाला नसल्याची माहिती मिळाली. पण राहुलने यामध्ये आपला काही संबंध नसल्याचे सांगत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. याच्या सुनावणीत न्यायालयाने राहुल केसवानी, हंसा आणि वासु केसवानी अशा तिघांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईच्या कुशीतून निसटून मृत्युच्या कुशीत

News Desk

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

News Desk

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk