HW News Marathi
क्राइम

मुलापाठोपाठ पित्याचीही आत्महत्या

परभणी अभ्यासाच्या तणावामुळे निराश होऊन मुलाने आत्महत्या केल्यानंतर चारच महिन्यांनी पित्यानेही आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना सेलू येथील समता नगर भागात मंगळवारी घडली. शंकर विश्वनाथ हुडेकर (४५) असे या पित्याचे नाव असून त्यांनी घरी छताच्या हूकाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. सेलू पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या आत्महत्येस पत्नी, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी जबाबदार असल्याचे हुडेकर यांनी आत्महत्यापुर्वी डाव्या तळाहातावर लिहुन ठेवले होते.

घरातील सर्व मंडळी झोपेत असतांना हुडेकर यांनी एका खोलीत छताच्या हूकाला दोरीच्या सह्याने गळफास घेतला. सकाळी सातच्या सुमारास घरची मंडळी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, हुडेकर यांचा मुलगा निलेश (१४) याने चार महिन्यांपुर्वीच अभ्यासाच्या तणावातून गळफास घेतला होता. त्यामुळेही ते निराश होते. या कुटुंबात आता पत्नी आणि एक छोटा मुलगा आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असह्य विवाहितेवर वारंवार बलात्कार

News Desk

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, वहीत रेखाटले आत्महत्येचे चित्र

News Desk

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk