HW News Marathi
क्राइम

…म्हणून तिने जाळून घेऊन केली आत्महत्या

मुखेड – लग्नाचं आमिष दाखवून अनैतिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्यानं एका तरूणीने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातील जांब इथे घडलीय. प्रियकर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करत असल्याचे समजल्यानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या तरूणीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

जांब बु़ येथील मयत तबसुम नवाज शेख हिचा विवाह नायगाव तालुक्यातील कहाळा येथील शब्बीर पटेल शेख यांच्याशी झाला़ विवाहानंतर तिला दोन अपत्य झाली़ मात्र सासरी पटत नसल्याने तबसुम माहेरी जांब बु़ येथे वडिलांच्या घरी राहण्यास आली़ दरम्यान, तिचे मगदुम गोरे मियॉसाब शेख याच्याशी सुत जुळले़ मगदुमने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले़ दुसरीकडे मगदुमच्या विवाहाची तयारी त्याच्या घरच्यांनी सुरू केली़ ही बाब तबसुम हिच्या लक्षात येताच तिने लग्नासाठी मगदुमकडे आग्रह धरला़. मात्र त्याने टाळाटाळ केली़ मगदुमचा विवाह चाकूर येथील मुलीशी जमवून ९ एप्रिल रोजी सकाळी जांब बु़ येथे धुमधडाक्यात पार पडत असतानाच तबसुम तेथे पोहोचली़ तिने लग्नास विरोध केला़ मागील हकीकत सर्वांसमोर मांडली़ काहींनी तिची समजूत घालून तिला वडिलांच्या घरी नेवून सोडले़.

तथापि ही बाब सहन न झाल्यामुळे तबसुमने घराची कोंडी आतून लावून रॉकेल अंगावर टाकून स्वत:ला पेटवूून घेतले़ यात ती ९० टक्के भाजली़ तिला नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला़ तबसुमचा भाऊ मोहसीन नवाज शेख याने मुखेड पोलिस ठाणे गाठून बहिणीच्या मृत्यू प्रकरणी मगदुम गोरे विरूद्ध तक्रार नोंदविली़ पोलिसांनी गुन्हा नोंदवून मगदुमला अटक केली़ सपोनि व्ही़ एम़ कांबळे तपास करीत आहेत़.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्य न्यायाधीशांना दहशतवाद्यांची धमकी

News Desk

सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Aprna

१४ वर्षाच्या तरुणाचा कोंबडीवर बलात्कार, हत्या

News Desk