HW News Marathi
क्राइम

ह्रतिकचा खंडाळा इथला भूखंड चौकशीच्या भोवऱ्यात

लोणावळा – बॉलीवूडचा अभिनेता ह्रतिक रोशन आता एका नव्या वादात सापडण्याची चिन्हं आहेत. ह्रतिक रोशनच्या कुटुंबियांची कंपनी सुंदर भवर हॉलिडे होम्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं खंडाळा इथं 30 कोटी रूपयांना एक भूखंड विकत घेतला होता. या भूखंडाशेजारील सरकारी भूखंडही या कंपनीनं बळकावल्याची धक्कादायक माहिती किरण गायकवाड यांनी पुढे आणलीय… माहिती अधिकारातून हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे.

किरण गायकवाड यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती. त्यानुसार रोशन यांनी डिसेंबर महिन्यात 30 कोटी रुपयांना हा भूखंड विकत घेतला होता. 181 बी मावळ तालुका हा 504 चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा आहे तसेच सर्वे नंबर 182 हा भूखंड दफनभूमीसाठी आरक्षित आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत जी माहिती मिळाली ती पाहून मला धक्का बसला हे दोन्ही भूखंड सध्या रोशन यांच्या कंपनीच्या ताब्यात आहेत असे किरण गायकवाड म्हणाले. रोशन यांच्या ताब्यातून ते भूखंड परत घ्यावेत यासाठी लोणावळा महापालिकेशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असेही किरण गायकवाड यांनी सांगितले.

राकेश आणि हृतिक रोशन यांनी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या जागेची जबाबदारी असलेल्या शाकीर शेखने सुंदर भवर हॉलिडे होम्सने कोणतेही बेकायदा काम केले नसल्याचे सांगितले. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंत उभारली. आम्ही कुठलेही उल्लंघन केलेले नाही. आमच्या जमिनीमध्ये सरकारी भूखंड आले असतील तर, सरकारने का दावा केला नाही ? असा प्रश्न शाकीर शेखने उपस्थित केला.

कागदपत्रांवरुन समोर आलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर 2016 रोजी रोशन यांनी ही जमीन विकत घेतली. यावर्षी नऊ फेब्रुवारीला संरक्षक भिंत बांधायला लोणावळा महापालिकेने मंजुरी दिली. 3 एप्रिल 2017 रोजी एमएसआरडीसीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. किरण गायकवाड यांनी जी कागदपत्रे समोर आणली आहेत त्याची आम्ही छाननी करु पण यावेळी यापेक्षा जास्त काही बोलता येणार नाही असे लोणावळा महापालिकेचे अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 नायर रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांना केली मारहाण

News Desk

मुखेडमध्ये अनधिकृत खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल

News Desk

अपहरण झालेल्या मुलाची चार तासात सुखरुप सुटका; जालना पोलिसांची कारवाई

News Desk